*मत मोजनीतून उजळणार विजयी उम्मेदवाराचे भाग्य*

*उम्मेदवारा सह कार्यकर्ते व मतदात्यांची उत्सुकता शिगेला*
*मतमोजनी ची संपूर्ण प्रशासन सज्ज*

*शासकीय औधिगीक प्रशिक्षण संस्था येथे होणार मतमोजनी*
*किशोर ढुंढेले सावनेर*
*सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र 49 करिता दि.21आक्टोंबर ला पार पडलेल्या मतदानात तीन लाख दहा हजार पाचशे ऐक्यांशी मतदात्यां पैकी एक लाख अकरा हजार नऊशे तेरा पुरुष तर अठ्यांनव हजार आठशे सहासष्ट महिला मतदाते असे दोन लाख दहा हजार सातशे ऐकोनअंशी असे 67-83 टक्के मतदान झाले आहे*
*मत मोजनीची जय्यत तयारी*
*शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था या मतमोजनी केन्द्रावर सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या नेतृत्वात दिपक कारंडे तहसीलदार सावनेर,सचिन यादव तहसीलदार कळमेश्वर,नायब तहसीलदार सौ.दराडे,मसाळ आदींच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजनी ची संपुर्ण तयारी झाली असुन एकुण 14 टेबल वर 27 फेर्यात सकाळी 8-00 मतमोजनीला सुरुवात होणार असुन पहिल्या फेरीचा निकाल 9-00च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे.स्ट्राँग रुम चे संपूर्ण व्यवस्थापन सीमा सुरक्षा दलाचे इंद्रेश कुमार याच्या देखरेखीत सीमा सुरक्षा दल्याचे सैनिक करत आहेत.तर पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सांभारकर,पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सुरक्षा चोख पणे हाताळल्या जाणार आहे.नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक राकेश ओला तसेच मुख्य निवडणूक निरिक्षक यांनी मत मोजनी स्थळाला भेट देऊन मत मोजनी व इतर व्यवस्थेची माहीती घेऊण मत मोजनी अधिकार्यांना योग्य मार्गदर्शन केले*
*आम्ही निवडून येतोच चा सुर*
*दि.21 आक्टोंबर ला पार पडलेल्या मतदाना नंतर आमचे स्थानिक प्रतिनिधींनी मतदाते व विविध पक्षांच्या कार्यकर्ते यांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मतदत्यांनी अपन केलेल्या मतदानिवर मौन पाळत “जो जीति वो अपना” चा सुर लावला तर भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते आप आपला उम्मेदवार मताधिक्यानी निवडून येणार असल्याचे बोलून दाखवीले*
*पर पडलेले मतदान व मतदात्यांचा छुपा कौल यामुळे दोन्हीही उम्मेदवारा पैकी कोन बाजी मारणार हे सांगणे जरी कठीण असले तरी मागील 25 वर्षा पासुन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे विद्देमान आमदार सुनील केदार पार पडलेल्या मतदानावर समाधान व्यक्त करुत आपल्या विजया बाबत आश्वस्त असल्याचे मीडिया प्रतिनिधींशी बोलून दाखविले तर भाजप उम्मेदवार डाँ.राजीव पोतदार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मुख्य लढत जरी या दोन पक्षात होत असली तरी निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्ष,वंचित आघाडी तसेच इतर उम्मेदवारांना मीळणार्या मतांवर निवडणुकीचा निकाल व विजय पराजयाचे अंतर अवलंबून राहील असे जाणकारांचे मत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज