Breaking News

*बॅरि शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय खापरखेडा येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने साक्षरता दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन*

*बॅरि शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय खापरखेडा येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने साक्षरता दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- बॅरि शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय खापरखेडा येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने साक्षरता दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साक्षरता दिनाचे औचित्य साधून ‘ करोनाकाळात महाविद्यालयीन शिक्षणाची सद्यस्थिती ‘ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व निवेदनाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर जी टाले हे अध्यक्षस्थानी होते तर मराठी विभाग प्रमुख डॉ अंजली पांडे या प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ प्रतिभा गडवे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साक्षरता दिनाचे महत्त्व आणि आवश्यकता प्रतिपादन केली. करोना काळात शिकणे आणि शिकविणे या दोन्ही बाबींमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. व या बदलत्या काळानुसार विद्यार्थी व शिक्षक यांनीही या नव्या बदलांना स्वीकारले असल्याचे प्रा. गडवे यांनी सांगितले. बी ए भाग ३चा विद्यार्थी सुमित चंद्रिकापूरे याने ऑनलाईन शिक्षणापेक्षा पारंपरिक शिक्षण पद्धती अतिशय चांगली होती असे म्हटले. शिकण्याबरोबरच महाविद्यालयातील मस्ती, मित्र मैत्रिणींसोबत मारलेल्या गप्पा या सर्वांची आम्हाला खूप आठवण येते असे चंद्रिकापूरे याने सांगितले. कु आशा चव्हाण हिने ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे असे सांगितले. कृष्णा वैद्य या विद्यार्थ्यांने ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल अथवा काम्प्यूटरचे ज्ञान नसते त्यांना पीपीटी आणि प्रोजेक्ट करणे कठीण जाते. असे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेत मागे पडत आहेत असे मत व्यक्त केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ अंजली पांडे यांनी सद्यस्थितीत विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही नवीन तंत्रज्ञानात्मक बाबी आत्मसात कराव्या लागल्या आहेत व त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत असे म्हटले. करोना काळात शिक्षकांनी शिक्षणाचा प्रवाह अखंडपणे चालू ठेवला असल्याचे डॉ अंजली पांडे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ आर जी टाले यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धती च्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा सखोल परामर्श घेतला. असे असले तरी करोना काळात शिक्षणाबरोबरच आपले स्वास्थ्यही कायम राखणे आवश्यक आहे यासाठी ऑनलाईन शिक्षण हाच एकमेव उपाय आहे असे प्राचार्य डॉ टाले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार डॉ ज्योती सेलूकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ गजानन सोमकुंवर, डॉ राजेंद्र राऊत, डॉ संगीता चोरे, प्रा. अभय काकडे, प्रा. अमित भुसारे श्री शंकर बहादुरे, श्री मंगल काकडे उपस्थित होते

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …