*समाजाच्या सकारात्मक बदलासाठी स्पर्धा परीक्षा सुकर मार्ग – मुख्याधिकारी धनंजय बोरीकर*
*अभ्यासाचे इतरांपेक्षा वेगळं नियोजन यशाचे गमक – बोरीकर*

*जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र , काटोलचा ग्रेट भेट उपक्रम*
काटोल प्रतिनिधी – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजच्या काळात अनेक सुविधा उपलब्ध आहे.पूर्वी संघर्षातुन अधिकारी घडले आहे.समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा सुकर मार्ग आहे. कारण आपल्या हाती प्रशासन आल्यावर विविध कार्य पार पाडता येते.चार लाख विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेला बसतात त्यातून दिड लक्ष विद्यार्थी मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरतात आणि केवळ चारशे विद्यार्थी अधिकारी म्हणून निवडले जातात.जे विद्यार्थी अभ्यासाचे वेगळं नियोजन करतात त्यांना यश मिळते असे प्रतिपादन काटोल नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी ग्रेट भेट उपक्रमातर्गत जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे केले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड , मार्गदर्शक म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के व नरेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोरीकर म्हणाले , स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी अधिकारी का व्हावे व अभ्यास कसा करावा ? या दोन प्रश्नांची उत्तर माहीत हवी.जोपर्यंत इतिहास तपासला जात नाही तोपर्यंत भविष्य घडविता येत नाही.विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे.स्वतः नोट्स तयार कराव्यात.स्वतः वर विश्वास ठेवून, कष्ट करण्याची तयारी असेल तर कौशल्यात वाढ होऊन यशाला गवसणी घालता येते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के , संचालन केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन वाळके, वसीम पठाण, अनुसया रेवतकर, सतिश बागडे आदींनी सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज