*देश हिताच्या संघर्षास सज्ज व्हा*–
अमरजित कौर (आयटक महासचिव )
खापरखेडा प्रतिनिधि-दिलीप येवले
भारतीय राज्य घटनेने देशातील नागरिकांना दिलेले मुलभुत अधिकार आणि मानवधिकारांची पायमल्ली करुन भारतीय लोकशाही व्यवस्थाच उध्वस्त करण्यासाठी मोदी सरकार सर्व धोरणे राबविली जात असून सर्वसामान्य आर्थिक राजकिय सामाजिक व सांस्कृतिक दिशा बदलण्याचे काम मोदी सरकार करीत आहे अशी परखड विधान आयटकच्या राष्ट्रीय सरचिटणीस काँ आमरजित कौर यांनी केले .
आयटक राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या केंद्र सरकार बेदरकारपणे खाजगीकरणचा अजिंडा राबवित असून देशातील संसाधने जल संपदा,वन,भुमी संपदा भांडवलदाराच्या घशात घालत आहे.देशाला कोट्यावधीचा रेव्हनी उपलब्ध करुन देणाऱ्या नफ्याचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवांचे खाजगीकरण करण्यात येत आहे.सरकारी उधोगातील रिक्त पदे भरण्यात येत नाही त्या बद्दल्यात आउट सोर्सीग करण्यात येत आहे.रेल्वे संरक्षण क्षेत्र विमान सेवा,शिक्षण,आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील महत्वाच्या संस्थाचे खाजगीकरण करुन देश हिताच्या विरुध्द मोदी सरकारने एक प्रकारे देशाचाच लिलाव करीत आहेत व याचे प्रत्यंतर मोदी सरकारने नुकत्याच मांडलेल्या अर्थ संकल्पनातही दिसले आहे असे सखोल प्रतिपादन काँ अमरजित कौर यांनी करील *देश हिताच्या संघर्षास सज्ज व्हावे*असे आवाहन त्यानी केले.
आयटकच्या शताब्दी वर्षाच्या आरंभाचा सोहळा मुंबई येथे दिनांक ३१ आँक्टोबर २०१९ पासून सूरु झाला असून उदघाटन सञात देशातील सर्व प्रमुख केंद्रीय कामगार संघटनाच्या नेत्यानी आयटकच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व त्यानंतर १ व २ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष काँ रमेन्द कूमार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीला सुरुवात करण्यात आली बैठकीत देशातील विविध राज्यातून नेते उपस्थित आहेत काँ.एच महादेवन,टि नरसिंहन,बलदेव घनघस,आर सी सिंग,एम एल.यादव,सुबारायण,शौरीबधू कार,आदी नारायणा,ओबी लेशु,निर्मलसिंग धालीवार,बरसिंग बाहर,सुकूमार दामले, रामकिष्ण पांडा,के.पी राजेन्द,विद्यासागर गिरी,रामधारी परासर,किस्तोफर फोनसेकार,मोहन शर्माजी,टि.एम.मूर्ती यांची मंचावर उपस्थिती होती.
राज्य कमेटीच्या वतिने सि.एन देशमुख,शाम काळे, बबली रावत,प्रा.राम बाहेती,राजू देशले,दिलीप उटाणे,प्रकाश बन्सोड,नामदेव चव्हाण,उदय चौधरी, कृष्णा भोयर,ज्योती नटराजन,शिवकुमार गणवीर, कारभारी उगले,माधुरी क्षीरसागर,सुमन पुजारी,शंकर पुजारी,सि.जे.जोसेफ,भारंती भोयर,मंजु वर्माजी यांची उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज