Breaking News

*अमरावती परिक्षेत्राच्या कायदा व सुव्यवस्थे चा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेलता आढावा*

*अमरावती परिक्षेत्राच्या कायदा व सुव्यवस्थे चा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेलता आढावा*


अमरावती विशेष प्रतिनिधी
अमरावती –  परिक्षेत्रातील, तसेच अमरावती शहर आयुक्तालयांतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठका गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मंथन सभागृहात संपन्न झाल्या. कोविड काळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले. पोलिसांना चांगला निवारा मिळावा यासाठी पोलिस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावे, अशी सूचना गृहमंत्री वळसे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला केली.

तसेच शिपाईपदी रूजू झालेल्या व्यक्तीला त्याच्या पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलिस विभागाची ताकद तसेच क्षमता वाढणार असल्याचेही प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले. अमरावती येथील मागासवर्गीय समाजावरील अन्याय प्रकरणी बोलत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देण्यात येईल.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …