Breaking News

*कन्हान येथे ओबीसी जागर अभियान रथ चे शुभारंभ*

*कन्हान येथे ओबीसी जागर अभियान रथ चे शुभारंभ*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका कन्हान शहर द्वारे ओबीसी जागर अभियान रथ चे शुभारंभ करुन उपस्थित मान्यवरांनी फडणवीस सरकार ने दिलेले ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असुन न्यायालय प्रभावीपणे बाजु न मांडल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले असे प्रतिपादन व्यक्त केले आहे .

भाजपा ओबीसी आघाडी महाराष्ट्र प्रदेश द्वारे ओबीसी जागर अभियानाचे शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक २७ आॅक्टोंबर ला सायंकाळ च्या सुमारास श्री रामभाऊ दिवटे यांच्या जनसंपर्क कार्यालय तारसा रोड गहुहिवरा चौक , कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा ओबीसी आघाडी नागपुर जिल्हा अध्यक्ष श्री एड प्रकाशजी टेकाडी यांच्या शुभहस्ते व भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष अमोल साकोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ओबीसी जागर अभियानाचे शुभारंभ करण्यात आले .

या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका सुषमा चोपकर , संगीता खोब्रागडे , अनिता पाटील , वर्षा लोंढे , स्वाती पाठक , तुलेषा नानवटकर , सुषमा मस्के , जयराम मेहरकुळे , सुनील लाडेकर , कामेश्वर शर्मा , संजय रंगारी , संजय चोपकर , सचिन वासनिक , रिंकेश चवरे , शैलेश शेळकी , सौरभ पोटभरे , ऋषभ बावनकर , मनोज कुरडकर , आकाश वाडनकर , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …