Breaking News

*छठ पुजे करिता कन्हान नदी पुल घाट व पिपरी घाटावर जय्यत तयारी*

*छठ पुजे करिता कन्हान नदी पुल घाट व पिपरी घाटावर जय्यत तयारी*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी शहरात व परिसरात अडीच महिन्यांपासुन कोरोना पुर्णपणे नियंत्रणात असुन ही सकारात्मक बाब लक्षात घेता यावर्षी कन्हान शहरात छट पुजे करिता कन्हान नदी रेल्वे व नविन पुलाजवळ आणि पिपरी घाटावर जेसीबी ने व मजुर लावुन नदी किनारा घाटावर जागा व्यवस्थित करून जय्यत तयारी करण्यात आली आहे.


कन्हान परिसरात कोळसा खाणी असल्याने उत्तर भारतीय लोकांचे बऱ्याच प्रमाणात वास्तव असल्याने कन्हान नदी किणाऱ्या वर उत्तर भारतीय लोकांचा महत्वाचा छठ पुजा हा भगवान सुर्यदेवाच्या उपासनेचा उत्सव चार दिवस साजरा करण्यात येतो. छठ पुजेचा सण कार्तिक शुक्ल षष्ठीला साजरा केला जात असला तरी त्याची सुरुवात कार्तिक शुक्ल चतुर्थी छठ पुजेचा पहिल्या दिवसी (नहाय खाय) सोमवार दिनांक.८ नोव्हेंबर ला स्नान करून नवीन कपडे घालुन उपवास ठेवुन करण्यात आला. छठ पुजेचा दुसऱ्या दिवसी (खरना) मंगळवार दिनांक.९ नोव्हेंबर ला कार्तिक शुक्ल पंचमीला दिवस भर उपवास करून संध्याकाळीही उपवास केला जातो . त्यास खरना म्हणतात. या दिवशी अन्नपाणी न घेता उपवास केला जातो. तांदुळ आणि गुळाची खीर संध्याकाळी खाल्ली जाते. छठ पुजेचा तिसऱ्या दिवसी बुधवार दिनांक.१० नोव्हेंबर ला अर्घ्य ते मावळत्या सूर्या पर्यंत नैवेद्य षष्ठीच्या दिवशी दिला जातो. बांबुच्या टोपल्यांमध्ये प्रसाद आणि फळे सजवली जातात. टोपलीची पुजा केल्यानंतर सर्व भक्त सुर्याला अर्घ्य देण्यासाठी तलाव, नदी किंवा घाट आदी ठिकाणी जातात. स्नान करून मावळत्या सूर्याची पुजा केली जाते. छठ पुजेचा चौथा दिवसी गुरूवार दिनांक.११ नोव्हेंबर ला उगवत्या सूर्याला अर्घ्य, छठ पुजेची सांगता म्हणजे सप्तमी ला सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पुजा केली जाते. विधिवत पुजा आणि प्रसाद वितरण करून छठ पुजा पूर्ण होते.
छठ पुजे करिता कन्हान नदी वरील नवनिर्मित रेल्वे व वाहतुकीच्या पुलाजवळी नदी किनाऱ्याची स्वच्छता व जेसीबी आणि मजुर लावुन जागा व्यवस्थित करण्यात आली.

या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, नगरसेवक राजेन्द्र शेंदरे, अजय लोढे, कामेश्वर शर्मा, मनोज राय, चंदन सिंह, सुजीत खरवार कन्हान नदीच्या पिपरी घाटावर सुध्दा स्वच्छता करून जेसीबी व मजुर लावुन नदी किनाऱ्याची जागा व्यवस्थित करण्यात आली यावेळी नरेश बर्वे, कांद्री सरपंच बळवंत पडोळे, धंनजय सिंह, प्रताप सिंह, विजय तिवारी, राजु सहानी,चंद्रशेखर सिंह, ओमप्रकाश पाल, कमलेश गुप्ता, अजित सिंह, संतोष गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …