*वक्तृत्व स्पर्धेत डॉ.सुवर्णा जांभूळकर येवले सर्वोत्कृष्ट बक्षीस जाहीर*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग द्वारा आयोजित खुली ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२१ दि. १० जुलै ते ५ ऑगस्ट यादरम्यान आयोजित करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भवाच्या काळात प्रत्येकाचं जीवनमान बदलेले असताना सामान्य जनतेपर्यंत विविध थोर समाजसुधारकांचे विचार वक्तृत्व शैलीतून डिजिटल माध्यमातून घराघरातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचा मानस परिषदेने ठरवला. या कार्यक्रमात १८५ स्पर्धकांनी हिररीने सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल दि. ७ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवसानिमित्त परिषदेच्या सर्व डिजिटल माध्यमांद्वारे जाहीर करण्यात आला. त्यात कर्मवीर गटात सर्वोत्कृष्ट या गटात डॉ.सुवर्णा जांभूळकर येवले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित उत्कृष्ट वक्तृत्व सादरीकरण केले होते. या सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय बोखारा येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.

त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक वक्तृत्व शैलीमुळे त्या विद्यार्थीप्रिय आहे. त्यांच्या याच वक्तृत्वाची छाप त्यांच्या व्हिडीओ सादरीकरणातून दिसून आली आणि त्यामुळेच परिक्षक सौ.किरण पेठे जिल्हाध्यक्ष नागपूर यांनी निष्पक्षपणे सर्वोत्कृष्ट बक्षिस देऊन निकाल जाहीर केला. तर बालवीर गटाचा सौ.स्विटी शेंडे कार्याध्यक्षा विदर्भ विभाग,श्री.मिलिंद भंडारे तालुकाध्यक्ष चिखली,बुलढाणा यांनी शूरवीर गटाचा निकाल जाहीर केला. या संपूर्ण स्पर्धेचे ग्राफिक्स तथा तांत्रिक संयोजन श्री.संदीप शेंडे यांनी केले, तर या आगळ्या-वेगळ्या वैचारिक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन श्री.आनंदकुमार शेंडे विदर्भ प्रदेशाध्यक्ष यांनी केले. सर्व स्पर्धकांचे डिजिटल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वक्तृत्त्व स्पर्धेमधील सर्व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेद्वारा अभिनंदन करण्यात आले.
Maharashtra News Media सच की आवाज