Breaking News

गडचांदूरचा मुख्य रस्ता बनला खड्ड्यांचा माहेरघर.

गडचांदूरचा मुख्य रस्ता बनला खड्ड्यांचा माहेरघर.


(एक किमीच्या रस्त्यावर शेकडो खड्डे.

आवारपूर प्रतिनिधि-गौतम धोटे

राजूरा-गोविंदपूर या मुख्य मार्गावरील औद्योगिक नगर म्हणून ओळखले जाणारे कोरपणा तालुक्यातील गडचांदूर शहरात मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून रेल्वे गेट ते वीर बीरसामूंडा चौक पर्यंत दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे.गेल्या दोन वर्षापूर्वीच याठिकाणी करोडोंच्या खर्चाने रस्ता बनवण्यात आला होता.मुख्य मार्गावरच शेकडो खड्डे पडल्याने प्रवाशी अगदी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे.सध्या किरकोळ अपघाताला सुरुवात झाली असून याकडे संबंधित विभागाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला व जिल्ह्यातील औधोगिक शहरातील एक नामांकित शहर अशी गडचांदूरची ओळख असली तरी आता खड्डयांनी व्यापलेला शहर म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.सध्या परिस्थितीत रेल्वे फाटक ते बिरसमूंडा चौका पर्यंतच्या खड्ड़यांची मोजणी केली तर विक्रमी आकडा समोर येतो.सात किमी रस्त्याचे काम 21 मार्च 2017 रोजी पूर्ण झाले आणि मार्च 2019 पर्यत कंत्राटदाराकडून या रस्तयाची डागडुजी करण्यात आली. मात्र गेल्या दोन,तीन महिन्यापासून सदर रस्त्यावर शेकडो खड्यांनी अक्षरशः अतिक्रमणच केलेले दिसत आहे.सा.बां.विभागा मार्फत निर्णय केलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे सुपूर्द झाल्याची माहिती आहे मत्र रस्ता निर्मिती पासुनच यावर खड्डे आणि भेगा पडायला सुरुवात झाली होती हे मात्र विशेष.लहानमोठे वाहन चालक एक खड्डा वाचवताना दुसऱ्या खड्ड्यात जाऊन अडकते त्यामुळे बरेचदा अपघात होऊन दुखापती झाल्या आहे.करोडोंच्या रस्त्यावर अवघ्या काही महिन्यातच खड्डे पडल्याने सदर कंत्राटदार आणि संबंधित विभागाची भूमिका संशयास्पद बनली असून ठिकठिकाणी उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …