*तायवाडे महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिवसाचे आयोजन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- तायवाडे महाविद्यालयातील जयंती पुण्यतिथी समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आज साजरा करण्यात आला या प्रसंगी जयंती- पुण्यतिथी समितीच्या वतीने *”डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचार”* या विषयावर डॉ.पंजाब शेरे , बळीराम पाटील महाविद्यालय किनवट , जिल्हा नांदेड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ.आंबेडकर हे वंचित व आर्थिक दुर्बल लोकांचे नेते होते त्यांनी दलितांना त्यांचे हक्क व अधिकार याची जाणीव करून समाजाला शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा देऊन दलितांनी सन्मानाने कसे जगावे हे त्यांनी आपल्या विचारातून शिकवले डॉ. बाबासाहेबांनी आर्थिक व राजकीय सामाजिक क्रांती करून तळागाळातील लोकांच्या विकासासाठी कार्य केले . भारताची घटना लिहून त्यांनी सर्व समाजाला विशेष सवलतीची तरतूद करून आर्थिक व सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला असे विचार डॉ. पंजाब शेरे यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला एकत्र करून समाजाच्या उत्थानासाठी विशेष आर्थिक व सामाजिक तरतूद करून दिली ,तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहून सशक्त लोकशाही कार्यक्रम रुजविण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शरद डवरे यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राहुल वाघमारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. सुनील घुगल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती पुण्यतिथीचे समितीचे सर्व सदस्य. महाविद्यालयीन प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
Maharashtra News Media सच की आवाज