*खेडी गावालगत पळकी नदीवरील जिर्ण पुल अपघातास निमंत्रण*

*नविन पुल बनविण्याची ग्रामस्थांची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – खेडी ते आजणी कडे जाणाऱ्या रसत्या वरील पुळकी नदीवरील खेडी गावालगत असलेल्या जुन्या जिर्ण पुलालाची अत्यंत दैनिय अवस्था होऊन अपघातास निमंत्रण देत असल्याने हा पुल नविन बनविण्याची मागणी गावकरी व शेतकरी मागील खुप दिवसापासुन करीत असुन सुद्धा संबंधित अधिकार्यांचा लापरवाही मुळे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे .

खेडी ते आजनी मार्गे रामटेक कडे जाणाऱ्या रस्त्या वरील हा पुल मागील काही वर्षा पुर्वी गावकऱ्यांच्या व शेतकऱ्यांचा सोयी करिता बैलबंडी, छोटी वाहन ये-जा करिता बनविण्यात आला होता. या पुला वरून गावक ऱ्याची व शेतकऱ्यांची चांगलीच वर्दळ असुन शेताकरिता खते, बियाणे आणि शेतपिकाची नेऑन करण्यास ट्रक्टर, ट्रक जड वाहन ये-जा करित असल्याने खेडी गावालगत असलेल्या पुळकी नदीवरील पुलाच्या निकृष्ट दर्ज्याच्या बांधकामामुळे आणि या पुलाची डागडुगु ची सुध्दा कंत्राटदारने थातुमातुर केल्याने या पुलावर भगदळ (गड्डे) पडुन अत्यंत दैनिय अवस्था होऊन गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना या पुलावरून ये-जा करतांना भयंकर त्रास सहन करावा लागत असुन अपघातास निमंत्रण देत आहे. शुक्रवार दिनांक.१० डिसेंबर ला शेतकरी आपल्या शेतातील धानाचे बोरे ट्रक्टर ट्रॉली ने आणत असतांना ट्रॉलीचे एक चाक पुलावरील गड्डयात फसुन ट्रॉली पलटुन अपघात झाला. सुदैवाने कुठलिही जिवहानी झाली नाही परंतु धानाचे नुकसान झाले. या रस्त्याने रामटेक ला जाण्यासाठी हा रस्ता सोईस्कर, कमी अंतर असुन गाव जोड रस्ता असल्याने पाच सहा गावाची दैनंदिनी वर्दळ असते. कुठलाही अपघात होऊन जिवहानी होऊ नये.

यास्तव हा नविन चांगल्या दर्ज्याचा पुल लवकरात लवकर बनविण्यात यावा. अशी मागणी विलास उमाळे, नाना कोचे, सुधाकर उमाळे, देवराव इंगळे, राजु कोचे, नंदु इंगळे, प्रकाश इंगळे, भगवान नागपुरे, गजानन काळे, हरिदास तिरोडे, सुशील ठाकरे, श्रीकांत चौधरी, बबलु गजबे, राजु नागपुरे, क्रिष्णा चौधरी, चांगदेव मेश्राम सह ग्राम पंचायत खेडी (बोरी) व गावकऱ्यांनी केली आहे.

Maharashtra News Media सच की आवाज