*पारशिवनी तालुक्यातील दोन्ही मतदान केंन्द्रात १००%टक्के मतदान*
*मतदान शांततेत पार ,तालुका निवडणुक आधिकार्यांची माहिती*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील दोन मतदान केंन्द्रात महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजता पर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली असुन या निवडणुकीसाठी पाराशिवनी तालुक्यातील दोन्ही मतदान केंन्द्रात १००%टक्के मतदान झाले.
पारशिवनी तालुक्यात ४०मतदारांपैकी ४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. रवींद्र भोयर व मंगेश देशमुख यांचे भाग्य आता मतपेटीत बंद झाले असुन येणाऱ्या मंगळवार दिनांक १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भाजप ही जागा राखते की काँग्रेस चमत्कार घडविते, हे मंगळवारलाच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मतदनाच्या एक दिवसापूर्वी काँग्रेसने आपले उमेदवार रवींद्र भोयर यांचा ‘हात’सोडत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यामुळे निवडणुकीत ‘ट्विस्ट’ आले होते.
या निवडणुकीत भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रवींद्र भोयर व अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पारशिवनी तालुक्यात निवडणुकीसाठी एकूण २ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यापैकी १केंन्द्र पारशिवनी तहासील कार्यालाय येंथे खोली एक वर तर तालुक्याच्या दुसरा १ मतदान केंन्द्र कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय च्या खोली क्रमांक १ केंन्द्र होते. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी खूपच कमी असल्याचे दिसून आले.कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नगराध्यक्षा करुणाताई आष्टनकर, सह काॅंग्रेस ,शिवसेना,भाजपा व प्रहार च्या सह दोन नामनिर्दैशित सदस्य असे एकुण २०मतदारांनी मतदान केले.तसेच पाराशिवनी नगर पंचायत च्या नगराधक्ष प्रतिभा कुभलकर,सह शिवसेना ,भाजपा ,काॅंग्रेस च्या मतदार सह दोन नामनिर्दैशित सदस्य सह असे एकुण २०मतदारांनी मतदान केले


असे पाराशिवनी तालुक्यातील दोन्ही मतदान केंन्द्रातील एकुण ४०मतदारां पैकी ४०मतदारांनी मतदान करून तालुकातील् मिळुन१००%टक्के मतदान झाल्याची माहीती तालुका निवडणुक आधिकारी यांनी दिली आहे .
*केंन्द्रावर मास्क, ग्लब्स, थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटाझरची व्यवस्था*
कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या मतदारांनसाठी सर्व मतदारांनी मतपत्रिकेवर आकड्यांमध्ये पसंतीक्रम नोंदवित मतदान केले. मतदान केंन्द्रांमध्ये मोबाईल, स्पाय कॅमेरा, स्पाय पेन, कॅमेरा, टॅब तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जाण्यास मनाई असल्याने दारासमोर अडविण्यात आले होते. तपासणी केल्यानंतरच आत प्रवेश दिला जात होता.
Maharashtra News Media सच की आवाज