*वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यानी विविध ज्ञान व कौशल्य आत्मसात करावी – डॉ.राहूल खराबे*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विविध ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे , तसेच काळानुरूप ग्लोबल होउन ज्ञानवंतांचा उपयोग विद्यार्थ्यांना करून देणे काळाची गरज आहे. वेगवेगळ्या मार्गदर्शकाकडून वेगवेगळे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत असते.त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे.असे मत डॉ.राहूल खराबे यांनी व्यक्त केले.

तायवाडे महाविद्यालय महादूला- कोराडी, येथील वाणिज्य विभागाच्या वतिने वाणिज्य अभ्यासमंडळाचे उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी उदघाटक म्हणून डॉ. राहुल खराबे,सहयोगी प्राध्यापक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, एमबीए विभाग, हे उपस्थित होते,तर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . शरयू तायवाडे या होत्या . त्यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा जीवनविषयक दृष्टिकोण अधिक प्रगल्भ व्हावा , विद्यार्थ्याला भाषेचे व्यवहारज्ञान प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी भाषेचा अभ्यास करणे अनीवार्य असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वाणिज्य अभ्यास मंडळाची भूमिका डॉ.वर्षा वैद्य यांनी विशद केला, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ .अशोक धोटे यांनी करुन दिला तसेच अभ्यास मंडळाची कार्यकारिणी घोषित केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.किशोर घोरमाडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.विनोद खापने यांनी केले .या कार्यक्रमाला वाणिज्य विभागाचे विद्यार्थी व महाविद्यालयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज