सरण पेटविण्याकरीताही मिळेना रॉकेल

उज्वला योजनेमुळे मुळे रॉकेल पुरवठा बंद
मोहपा प्रतिनिधि -मुशीर सय्यद
गरिबांच्या उत्थानाकरिता सरकार कटिबद्ध असल्याचा नेहमीच गाजावाजा केला जातो परंतू गरिबांच्या पदरातील कित्येक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.घराघरांत गॅस सिलिंडर पोहचल्याने केरोसीन च्या पुरवठ्यावर परिणाम झाला गेल्या आठ महिन्यापासून केरोसीन मिळने बंद झाले आता मात्र गॅसच्या वाढत्या दरामुळे ग्राहक पुन्हा केरोसीन कडे वळताना दिसत आहे त्यामुळे केरोसीन चा कोठा पुन्हा मिळावा असे नागरिकांचे म्हणने आहे.
ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी व मोल मजुरी करणारे गरीब मजूर असतात शेतकऱ्यांना तर सरपण पेटविण्याकरिता,दिव्याकरीता व विशेष म्हणजे मृत पावलेल्या व्यक्तीला पेटविण्यासाठी रॉकेलची आवश्यकता असते मात्र शासनाकडून केरोसीन देने बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.ग्रामीण भाग हा देशाचा आधार आहे ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होणे काही नवे नाही उन्हाळा,पावसाळा असो की हिवाळा या तिन्ही ऋतूत केव्हाही काहींना काही कारणास्तव वीज हमखास खंडित होते रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी उपाय म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिव्याचा वापर करावा लागतो परंतू दिव्यात टाकायला केरोसीन नसल्याने त्यांना वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत अंधारातच राहावे लागते.शेती उपयोगाकरिता शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर केरोसीन वर चालणारे पाण्याचे इंजिन दिले या पाण्याच्या इंजिन मुळे नदी नाले,तलाव,विहिरी या ठिकाणी इंजिन लावून शेतकरी आपल्या पिकाकरिता सिंचनाची व्यवस्था करीत होते पण आता हेही केरोसीन मिळत नसल्याने बंदच्या मार्गात सापडले आहे.
शासनाच्या उज्वला गॅस योजनेमुळे तसेच धुरामुळे होणारे महिलांच्या शरीरावर दुष्परिणाम यांच्या जनजागृतीमूळे प्रत्येक घराच्या किचनमध्ये गॅस दिसू लागल्या त्यामुळे साहजिकच गॅस सिलिंडर ची मागणी वाढली आहे परंतू ग्यास च्या किंमती गगनाला भिडत आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी,मजुरवर्ग यांना ग्यास सिलिंडर विकत घेणे आवाक्याबाहेर होत आहे. गॅस बचत करण्यासाठी पर्याय म्हणून अनेक गृहिणी रॉकेल वर चालणाऱ्या स्टोव्ह चा वापर करीत होत्या परंतू शासनाने केरोसीन बंद केल्याने स्टोव्ह घरात गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज