*पाच महिला पाण्यात बुडाल्याने आकस्मिक मु्त्यू*
*गोसेखुर्द च्या बॅक वॉटर मधून नावेतून जात असताना नाव बुडाल्याने झाला घात*
*एका महिलेचा मृत्यु तर तीन अत्यावस्था,एका महिला सुखरूप*
*मिरची तोडणी आणि कापूस वेचणीला जात असताना घडली घटना*
नागपुर – पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत आज रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान मौजा कुजबा येथील 5 महिला कापूस वेचण्याकरिता आम नदीच्या पलीकडील शेतमालक नामे परमानंद तिजारे रा. टाकली यांच्या शेतामध्ये त्यांच्याच डोंग्याने जात असता आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा पलटल्याने डोंगयामध्ये पाणी भारत असता, डोंग मध्ये बसलेल्या महिला घाबरल्याने त्यातील सौ गीता रामदास निंबारते ही मरण पावली व उर्वरित मनू सुरेश साळवे , मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी लोमेश्वर गिरी , मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे उपचार घेत असून, त्यापैकी नामे लक्षमी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांना प्राथमिक उपचार करून मेडिकल कॉलेज येथे रेफर करण्यात आले.
Maharashtra News Media सच की आवाज