*शेताच्या झोपडयाला आग लागुन गायीचे वासरू, शेती साहीत्य जळुन राखरांगोळी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – वराडा येथे रात्री अवकाळी वादळ वारा, विजेच्या कडकडयाक्यात पाऊस येऊन शेतातील झोपडयावर विज पडुन आग लागुन कुटार व शेती उपयोगी साहीत्य जळुन राखरांगोळी होऊन झोपडयात बांधलेल्या गायीच्या ३ वासरा पैकी १ जळुन मुत्यु, १ जख्मी तर १ सुखरूप बचावले. असे एक लाख रूपयाच्या जवळपास शेतकरी आशिष भालेराव यांचे अवकाळी पाऊ सामुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
शनिवार दिनांक.१९ फेब्रुवारी २०२२ ला वराडा येथील शेतकरी आशिष चंद्रमोहन भालेराव वय २६ वर्ष यांच्या कडे वडलोपार्जित ८ एकर शेती आहे. शेत धुऱ्यावर शेतीचे साहीत्य व जनावरे करिता झोपडे २ बैल, २ गायी व तीन वासरू असुन सायंकाळी अचानक हवामान बदल्याने २ बैल व २ गायी बाहेर आणि ३ गायीचे वासरू झोपडयात बांधुन घरी आले. दुसऱ्या दिवसी रविवारी सकाळी शेतात गेले असता झोपडयाला आग लागलेली दिसल्याने आजु बाजुच्या शेतकऱ्याला बोलावुन आत पाहीले असता खुटयाला बांधलेले एक काळया, पांढऱ्या रंगाचे एच एफ जातीचे गायीचे एक वासरू जळुन मुत्यु पावले. कसेतरी सुटुन दुसरे जख्मी आणि तिसरे सुखरूप बचावले. झोपडयात ठेवलेले २ टँक्टर कुटार, नागर, वखर, तिफन, ज्यु, बेडडया संपुर्ण शेती उपयोगी साहित्य जळुन राखरांगोळी झाली. ही आग रात्री ला झालेल्या पाऊसात विज पडुन झोपडयाला आग लागली असावी असा कयास व्यकत करित शेतकऱ्याचे २ वर्षाचे गायीचे वासरू किंमत ३५ हजार रूपए कुटार किंमत ११ हजार व इतर शेती उयोगी साहित्य असे जवळपास एक लाख रूपयाच्या मुद्देमालाचे नुकसान झाल्याने युवा शेतकरी आशिष भालेराव चिंतातुर झाला आहे. घटनास्थळी वराडा सरपंचा, ग्रामपंचायत सदस्य , पटवारी , पोलीसांनी भेट देत घटना स्थळाचा पंचनामा करून आग लागल्याची नोंद करून वरिष्ठाना अहवाल पाठविण्यात आला आहे .

पिडीत शेतकऱ्यास शासना व्दारे आर्थिक साहाय्यता देण्यात यावी- सौ विद्याताई चिखले.
अवकाळी वादळ , वारा , विजेच्या गर्जेने सह पाऊस आल्याने वराडा येथील शेतातील झोपडयावर विज पडुन आग लागल्याने एका दोन वर्षाचे गायीचे वासरू मुत्यु पावले तर एक जख्मी झाले आणि शेती उपयोगी साहित्य आगीत जळुन राखरांगोळी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात एक लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याने शासना व्दारे चिंतातुर शेतकऱ्यास आर्थिक साहय्यता करण्याची मागणी गावकरी व शेतकऱ्यांच्या वतीने वराडा सरपंचा विद्याताई दिलीप चिखले हयानी केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज