*जागतिक महिला दिन महोत्सव संपन्न*
काटोल प्रतिनिधी – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – जेष्ठ नागरीक मंडळ काटोल द्वारा मंडळाचे विरंगुळा केंद्रात जागतिक महिला दिन महोत्सव पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परीषद काटोल च्या माजी नगराध्यक्षा सौ. वैशालीताई ठाकुर यांनी केले. अध्यक्षस्थानी श्रीमती निर्मलाताई कोंडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ.सौ आश्विनीताई करांडे, अॅड.वंदनाताई चौधरी व पोलिस उपनिरीक्षक पूनम कोरडे उपस्थित होत्या.याशिवाय मंचावर मडंळाचे अध्यक्ष श्री रमेश तिजारे, उपाध्यक्ष शामरावजी झामडे व सचिव गजाननराव भोयर उपस्थित होते.
सर्व निमंत्रित पाहुण्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शनातून वैशालीताई ठाकुर यांनी कुटुंबातील स्त्री, संतुलन राखून,सर्वांची मने जिंकून,कोणालाही भावनिक ठेच न पोहचविता व त्याचे श्रेय स्वतः कडे न घेता कौटुंबिक कोंडी कुशलतेने सोडविण्याचे कार्य करते.कुटूंब, समाज, देशाच्या विकासात यथोचित योगदान करणे ही स्त्रियांची भुमीका आजच्या बदलत्या काळाची खरी गरज असल्याचे सांगितले.
डाॅ.करांडे यांनी महिलांनी स्वतःची जबाबदारी व कर्तव्य पार पाडतांनाच स्वतःच्या आरोग्याकडे, आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे,यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल विवेचन केले. महिलांवर होणारे अत्याचार, हिसांचार व त्यांना कायद्याद्वारे मिळणारे संरक्षण यासंबंधी अॅड.चौधरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सर्व अबाल वृध्दांनी मोबाईलचा वापर जपुन करावा,त्यापासुन काय धोके होत आहे.याकडे लक्ष वेधून वाईट प्रसंगी पोलिसांची तत्पर मदत घ्यावी.असे असे पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे यांनी उपस्थितांना उद्बोधन केले.
कौटुंबिक हिसांचार टाळण्यासाठी आईने मुलींना चांगली शिकवन देणे, चांगले संस्कार करणे आवश्यक असल्याचे महत्व श्रीमती कोंडे यांनी अध्यक्षीय भाषणातुन विषद केले.
13 जेष्ठ नागरीकांना सामुहिक वाढदिवसानिमित्त पेन,डायरी भेट देण्यात येवुन उर्वरित निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक मडंळाचे सचिव गजाननराव भोयर यांनी सादर केले.वनिताताई राऊत यांनी संचालनाचे कार्य उत्तमपणे पार पाडले.तर मंडळाचे उपाध्यक्ष शामराव झामडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मडंळाचे सहसचिव अरुण पुंड, कोषाध्यक्ष रूपराव राऊत, संचालक हीतेंद्र गोमासे, रामदासजी कळंबे, अशोकराव काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात “खरा तो एकचि धर्म ” या साने गुरुजी च्या प्रार्थनेने तर समारोप ज्ञानेश्वर माऊली च्या पसायदान या गीताने करण्यात आला.शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात येवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास 175 महिला पुरूषांची उपस्थिती लाभली होती.
Maharashtra News Media सच की आवाज