Breaking News

*प्राणहिता नदीत नाव उलटून तेलंगाणा राज्याचे दोन वन कर्मचाऱ्यांचे मृत्यू*

*प्राणहिता नदीत नाव उलटून तेलंगाणा राज्याचे दोन वन कर्मचाऱ्यांचे मृत्यू*

*सिरोंचा प्रतिनिधी -तिरुपती चिटयाला*

असिफाबाद जिल्ह्यातील चिंतालामानेपली तालुक्यातील तेलंगणा राज्याचे दोन वन कर्मचारी नावेने जात असताना नाव उलटून दोन वन कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाली आहे.
प्राप्त माहिती नुसार असिफाबाद जिल्ह्यातील चिंतालमानेपली तालुक्यातील चार वनकर्मचारी तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील गुडेम गावाजवळील जंगलात फिरून त्यांनी एका नावेने प्राणहिता नदीतून महाराष्ट्र राज्यातून तस्करी तेलंगणा कडे कसे येतात याची पाहणी करत असताना नाव खोल पाण्यात घेल्याने तसेच पाण्याचे प्रवाह जास्त असल्याने नदीत नाव उलटली आहे.
या नावेत तेलंगणा राज्याचे चार वन कर्मचारी आणि एक स्थनिक नागरिक व नाव चालक होते.अचानक नाव उलटल्याने नावेतील सगळेच पाण्यात पडले असून ही माहिती नागरिकांना मिळतच नागरिकांनी नदीकडे धाव घेऊन त्यामधील चार नागरिक सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र बाळकृष्ण आणि सुरेश नावाचे दोन वन कर्मचाऱ्यांचे जलसमाधी झाली आहे.
बुडालेल्या नावेचा आणि बुडालेल्या वन कर्मचाऱ्यांचे शोध मोहीम सुरू आहे

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …