Breaking News

*सतत पावसामुळे पेंच धरण 82% भरले , कन्हान नदी पात्रात वाढ* *केव्हा ही धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता , नदी काठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

*सतत पावसामुळे पेंच धरण 82% भरले , कन्हान नदी पात्रात वाढ*

*केव्हा ही धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता , नदी काठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – मध्यप्रदेश , महाराष्ट्र , सह संपुर्ण नागपुर जिल्ह्यात आणि पारशिवनी तालुक्यात सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांचे जन जीवन अस्त व्यस्त झाले असुन जागोजागी रस्त्यावर पाणी जमा झाल्याने स्थानिक प्रशासनाची पोल खोल झाली असुन कन्हान नदी पात्राच्या पाण्यात वाढ झाल्याने नदी दुथळी भरुन वाहत आहे .


पारशिवनी तालुक्या सह शहरातील अनेक भागात मागील काही दिवसान पासुन सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे मौसम ठंडगार झाले असुन नागरिकांचे जन जीवन अस्त व्यस्त झाले आहे . पांधन महामार्गा वर गड्डे निर्माण झाल्याने पावसाचे पाणी जमा झाल्याने नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाची पोल खोल झाली आहे व सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे कन्हान नदी पात्रातील पाण्यात वाढ झाली असुन नदी दुथळी भरुन वाहत आहे . त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे कडकडीचे आव्हाहन प्रशासना कडुन परिसरात दवंडी फिरवुन करण्यात आले आहे .
तसेच नवेगांव खैरी पेंच प्रकल्प धरणात सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे जवळपास धरण ८२% भरले असुन आणखी दोन ते चार दिवसांचा पाऊस आल्यास पाण्याचा विसर्ग कन्हान नदी पात्रात करण्यात येईल अशी माहिती एन एस सावरकर यांनी दिली आहे .सध्या च्या परिस्थिति मध्ये संकलीत पाणीसाठा १४१.९८४ दलघमी असुन रविवार दिनांक १० जुलाई ला सकाळी ६:०० वाजता पाण्याची पातळी ३२३.८०० ऐवढी झाली आहे . पानीसाठा ११६.५१ दलघमी असा नोंद करण्यात आला . पेंच धरण परिसरात व आजु बाजुच्या परिसरात सातत्याने जोरदार पाऊस पडत असल्याने धरणातील जलसाठा वाढला १ ते १५ जुलाई पर्यंत ८५% पाणीसाठा साठविणे प्रस्तावित आहे . पाणीसाठा ८५% टक्के पेक्षा अधिक वाढल्यानंतर कधी ही पेंच धरणाचे दरवाजे उघडुन ते नदी पात्रात सोडण्यात येईल नैसर्गिक आप्पती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत प्रशासना ने दक्ष राहण्याचा सुचना पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनी चे उपविभागीय अभियंता एन एस सावरकर यांनी दिली आहे . त्यामुळे पेंच व कन्हान नदी काठावरील गावे असलेल्या नागरिकांनी दक्ष राहुन नदी पात्रात गुरांना पाणी पाजने , गुरेढोरे धुने , कपडे धुने , आंघोळ करणे , मासेमारी करणे व विना कारण नदी पात्रात जाण्याचे धोक्याचे असुन ते टाळावे असे कडकडीचे आव्हाहन रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपते , तहसीलदार प्रशांत सांगडे , पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे , सह संबंधित अधिकार्यांनी केले आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …