गडचांदूरातील सुखकर्ता चिटफंड प्रकरणात कारवाई करा.
गुंतवणूकदारांची मागणी,आत्मदहनाचा इशारा.
आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे
रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स,फायनान्स व चिटफंड अशा बोगस कंपन्या उघडल्या जातात आणि याद्वारे दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून भोळ्याभाबड्या गुंतवणूकदारांची लुबाडणूक व फसवणूक केली जात असल्याची घटना ठिकठिकाणी घडत असतानाच कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरातील सुखकर्ता चिटफंड प्रा.लि.कंपनी संचालकांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याची घटना प्रकाशात आली आहे.यात गुंतवलेले पैसे परत मिळावे व चिटफंड संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी अंदाजे दोन-तीन वर्षांपासून गुंतवणूकदारांनी संबंधित विभागांना लेखी तक्रारी केल्या मात्र आजतागायत याविषयी सकारात्मक काहीच घडले नाही.ही बाब लक्षात घेऊन अखेर गुंतवणूकदारांनी २५ डिसेंबर रोजी स्थानिक गांधी चौक येथे एकदिवसीय अन्न त्याग आंदोलन केले.आताही न्याय न मिळाल्यास येत्या १ ते ३० जानेवारी दरम्यान केव्हाही,कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा गुंतवणूकदारांनी News34 च्या माध्यमातून दिला आहे.
Maharashtra News Media सच की आवाज