Breaking News

*डॉ.पंजाबराव देशमुख शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे कैवारी होते – डॉ शरयू तायवाडे*

*डॉ.पंजाबराव देशमुख शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे कैवारी होते – डॉ शरयू तायवाडे*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी-दिलीप येवले

डॉ.पंजाबराव देशमुख हे एका शेतकरी कुटूंबात जन्‍माला आले होते.त्‍या काळातील शेतकर्‍यांची व्‍यथा त्‍यांनी पाहिली होती,शेतकर्‍यांचे जीवन जर विकसित करायचे असेल तर त्‍यांच्‍या मुलांना शिक्षणाकडे वळविणे आवश्‍यक आहे ,असे त्‍यांना वाटू लागले म्‍हणून त्‍यांनी शिवाजी शिक्षण संस्‍थेची स्‍थापना करून शिक्षणाचे लोन सर्वत्र पोहचवून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्‍याचे कार्य केले.असे आपल्‍या अध्‍यक्षिय भाषणातून व्‍यक्‍त केले.
तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी येथे जयंती-पुण्यतिथी समितीतर्फे डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची१२१वी जयंती संपन्न झाली, याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे उपस्थित हाेत्या तर प्रमुख अतिथी मराठी विभागाचे सहयाेगी प्राध्यापक डॉ राजेंद्र वाटाणे हाेते, याप्रसंगी डॉ राजेंद्र वाटाणे यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेताना भाऊसाहेबांचे वक्तव्य आणि कर्तुत्व किती एकरूप आहे याची जाणीव करून देताना त्यांचे समस्त जीवनच समर्पण, त्याग आणि कर्मयोग यांची गाथा असून अखंड कर्तृत्वाचा ज्ञान यज्ञ असल्याचे सांगितले, शिवाय डॉ भाऊसाहेबांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य जसे केले त्याचप्रमाणे अस्पृश्य निवारणाचे त्यांनी केलेले कार्य देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी कसे उपयुक्त ठरणारे आहे याची जाणीव करून दिली.यावेळी सूत्रसंचालन डॉ दिगांबर समर्थ यांनी तर आभार प्रदर्शन डॉ वकील शेख यांनी केले, यावेळी समीतीच्‍या समन्‍वयक डॉ. निता धावडे, डॉ .आनंद भाईक,डॉ. माराेती वाघ, डॉ. रवींद्र बाहेकर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …