हिरवा बांबू कारागिरांना खुला कराण्याची मागणी
सचिव-संतोष पटकोटवार

आवारपूर प्रतिनिधि गौतम धोटे
चंद्रपूर जिल्ह्यात बांबू कारागिरांना उत्तंमरित्या जिवन जगण्या करिता वनातील हिरवा बांबू खुला करण्याची मागणी असून या बांबूपासून विविध प्रकारचे वस्तु तयार करून आपल्या मुलाबाळांचे पालनपोशन करण्याचे काम बुरुडकामगार अनेक वर्षांपासून करीत आहे, त्यांना शासनामार्फत दरवर्षी सवलती दरात बांबू पुरवठा केला जातो परंतू नेहमी निकृष्ठदर्जाचा बांबू पुरवठा होत असल्याने त्याना नाईलाजाने चोरीछुपे बांबू तोडण्यास वनात जावुन बांबू कटाई करून आनावे लागतात ,जिवाचे रान करून वनातील हिरवा बांबू आनत असताना तसेच त्यापासून बनविलेल्या वस्तूला बाजारात विक्रीसाठी नेत असताना वनविभागाचे अधिकारी कायद्याचा धाक दाखवून गाडी अडवतात व दंडात्मक कारवाई करतात, त्यामूळे बुरुड कारागिरांची मोठी दयनीय अवस्था होत आहे, जिवन कसे जगावे असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे, बांबू कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, हि परीस्थिती निर्माण होऊ नये व उत्तमरीत्या जीवन जगता यावे यासाठी कायद्यात बदल करण्यात यावे व वनातील हिरवा बांबू खुला करण्यात यावा वनविभागाच्या तावडीतून बूरूडकामगाराची कायमस्वरूपी सुटका करण्यात यावी, हि विनंती
प्रतीलीपी,
1)मा,श्री कीशोरभाऊ गजाननरावजी जोरगेवार आमदार चंद्रपूर (मतदार संघ)
2)जिल्हाधिकारी चंद्रपूर 3)मुख्यवनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर
4)मा,श्री,सुभाषभाऊ धोटे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र
5)मा,श्री वामनरावजी चटप माजी आमदार राजुरा
6)मा़,श्री प्रभाकरराव पटकोटवार
अध्यक्ष विदर्भ बूरूड समाज संघटना चंद्रपुर
7)मा,वनपरीक्षेत्र अधिकारी वनसडी यांना माहितीस निवेदन सादर
Maharashtra News Media सच की आवाज