**आज स्त्रीयांच्या संरक्षित विकासासाठी सावित्रीबाईच्या विचारांची गरज :डॉ.आसावरी दूर्गे **

तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी येथे सावित्रीबाई फूले यांची १८३ वी जयंती साजरी करण्यात आली
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी– व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जयंती पुण्यतीथी समीतीच्या समन्वयक डॉ.निता धावडे उपस्थित हाेत्या तर प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ आसावरी दूर्गे या हाेत्या. याप्रसंगी डॉ आसावरी दूर्गे यांनी सावित्रीबाई फूले यांच्या कार्याचा व्यक्तित्वाचा वेध घेताना त्यांचे कार्य आणि कर्तुत्व आज किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव करून देताना त्यांचे समस्त जीवनच समर्पण, त्याग आणि कर्मयोग यांची गाथा असून त्यांच्या कर्तृत्वाचा ज्ञान यज्ञ असल्याचे सांगितले, शिवाय त्यांनी सामाजिक, व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य जसे केले त्याचप्रमाणे अस्पृश्य निवारणाचे त्यांनी केलेले कार्य देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी कसे उपयुक्त ठरणारे आहे याची जाणीव करून दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ वकील शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ रविंद्र बाहेकर यांनी केले, यावेळी समीतीचे सदस्य डॉ.दिगंबर समर्थ, डॉ .आनंद भाईक,डॉ. माराेती वाघ,व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Maharashtra News Media सच की आवाज