*मुख्य अभियंता यांची औष्णिक विघुत केंद्रात अरेरावी नियमा वर नियम लावत असल्याने विघुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ने दिला आंदोलनाचा ईशारा*

*वरिष्ठ अधिकारी वापरतील हेडफोन आणि स्मार्ट फोन बाकी सर्वाना हेडफोन व स्मार्ट आणायला पांबदी*

*दि. 16.01.20 पासून औष्णिक विघुत केद्रात स्मार्ट फोन वापरण्यास बंदी स्मार्ट फोन असल्यास वीज केद्रात प्रवेश नाही*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*संदर्भीय पत्र क्रमांक एक नुसार औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा येथे कार्यरत बरेच अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार, शिकाऊ कामगार स्मार्टफोन व हेडफोन चा वापर करत असल्यामुळे त्यांचे कामावरचे लक्ष विचलित होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्ट नमुद करून कारखाना कायदा 1948 कलम 999 मधील तरतुदीचे देखील उल्लंघन होत आहे. त्या अनुषंगाने सुरक्षा विभागात निर्देश देण्यात आलेले आहे. फक्त विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्मार्टफोन सहित दिनांक 16.01.2020 पासून प्रवेश द्यावा असे नमुद केलेले आहे.
स्मार्टफोन अधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांनी कामावर वापरला तर कारखाना कायदा 1948 कलम 999 मधील तरतुदीचे देखील उल्लंघन होत नाही का? कामगारांनी कामावर हजर असताना स्मार्टफोन वापरला तर कारखाना कायद्याचे उल्लंघन होते आणि अधिकाऱ्याने वापरला तर उल्लंघन होत नाही का? असा स्पष्ट अर्थ आपल्या परिपत्रकाचा निघतो प्रचलित पद्धतीमधील कुठलाही बदल करावयाचा असल्यास संघटनांना विश्वासात घेऊन बदल करायला पाहिजे हा सुद्धां नियमच आहे याचे भान न ठेवता निर्णय आपण घेत आहात अधिकाऱ्यांनी स्मार्टफोन कामावर हजर असताना वापरला तर कारखाना कायद्याचे उल्लंघन होत नाही आणि कामगारांनी वापरला तर होते ही कृती भेदभावपुर्ण व नियमाबाहय असल्यामुळे आपण त्वरीत बिना विलंब आपले परिपत्रक मागे घ्यावे अधिकारी जर कामावर स्मार्टफोन वापरतील तर कामगार सुध्दा स्मार्टफोन वापरतीलच किंवा कामगारांसाठी व अधिकाऱ-यांसाठी स्मार्टफोन वापरण्यांचा बाबतीत संघटनेनेला अवगत करावे अन्यथा माझे सभासद हि भेदभावपुर्ण वागणुक खपवुन घेणार नाही यांची दखल घ्यावी असा ईशारा विघुत क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन केंन्द्रीय उपाध्यक्ष गजानन सुपे यांनी दिला आहे.
Maharashtra News Media सच की आवाज