*प्रवाशी बस स्थानकावर तर एस टी च्या बस गाड्या ढाब्यांवर !*
*कसे वाढनार प्रवासी संख्या*
*भरारी पथाकांचे कार्यप्रलाणी वरच प्रश्न चिन्ह!*
कोंढाळी प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा च्या तुघलकी निर्णया मुळे प्रवासी आपल्या पुढील प्रवासा करती बसस्थानक परिसरात बस च्या प्रतिक्षेत उभे असतात . तर! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी बस चे चालक आपल्या जिभेचे चोचले पुरविण्याकरीता (स्वाद आनंद घेण्यासाठी )आपल्या कामगिरीवरील प्रवासी बस चालक -वाहक ४३ गावांला संलग्न असलेल्या व नागपुर वरून ५० किलोमीटर अंतरावरील कोंढाळी सारख्या महत्वाच्या बसस्थानकावर आपली बस आनण्या ऐवजी सामोरील ऊडाणपुलावरून सरळ पुढे निघुन जातत व कोंढाळी चे प्रवासी बसलेच तर बसस्थानक पासून ५००मिटर दुर अंतरावरील वर्धा चौफुली वर थांबवितात, यात शिवशाही तर आहेच अन्य प्रवासी बस सेवांचे चालक -वाहकांचे जीभेच चोचले पुरविण्याकरीता प्रवास्यांना ताटकाळत ठेवणे, किंवा ५००मिटर दुर प्रवास्यांना उतरवीने या सारखे प्रकारा मुळे एस टी चा प्रवासी किंवा एस टी बसस्थानक असलेला पैसा(प्रवासी) एस टी पासून दुरावत चालला आहे.
त्याच प्रमाणे तपासनी पथके, भरारी तपासनी पथके यांचे वाहकां सोबत तपासनी पद्दत वाहकांकडे असलेले भ्रमण ध्वणी वरील गृप या सर्व बाबी पाहता एस टी ला प्रवाश्यांची गळती लागली आहे, यातून ना नफा ना तोटा या तत्वावर चालविल्या जात असले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस टी)महामंडळ दर किलोमिटर सहा रूपये तोट्याने चालविल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे. एस टी ला गत वैभव मिळवायचे असल्यास रस्यात्यावर ऊभे राहून पुढील प्रवासा करिता हात दाखविणारा प्रवाश्यांची उचल करने, भरारी पथके दर तिन महिण्यानी बदलने, बस सेवा वेळेवर देणे, प्रत्येक बस स्थानकापासून 200मिटर दुर अंतरापर्यंत अवैध प्रवासी वाहने ऊभी करने, यासारख्या लहान पण महत्वाचे प्रश्न निकाली काढल्यास सोबतच वरिष्ठ पातळीवर बांकामे, यंत्र साहित्य खरेदी सारखे प्रकरणी प्रामाणिकता दाखविले तरी एस टी ला गत वैभवाचे उंबरठ्यावर जरूर जाऊ शकते , मात्र या करीता वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचे कडे एम डी व उपाध्यक्षपदी नियुक्ती करून परिवहन मंत्री ते मुख्यमंत्री त्यांचे पाठीशी असावे तरच महाराष्ट्राची प्रवाशी वाहतुकीची रक्तवाहिनी आपला प्रवाशी वाहतुकीची प्रवासी संखेत वाढ होऊन एस टी त कामावर कामगार संखेत वाढ होऊन शकते मात्र, बसस्थानकां ऐवजी खाजगी हाॅटल धाब्यांवर अधिकृत बस थांबे देणे ही मन रंगेल आदेश मागे घेतल्याशिवाय एस टी त सुधाराना अशयक्य वाटते.