*अंधश्रध्देच्या उच्चाटनासाठी युवकांनी पूढे येण्याची आवश्यकता : श्री पराग पोटे*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
अंधश्रध्दा ही समाजासाठी घातक आहे ,कारण या अंधश्रध्देमुळे अनेक कुटूंब उध्वस्त झालेली आहेत,त्यांनी अंधश्रध्देबाबतचे आपले अनुभव कथन करून आज युवकांनी पुढे येवून समाजातून अंधश्रध्देचे उच्चाटन करावे,असे आव्हान वाहतुक पोलीस निरीक्षक श्री.पराग पोटे यांनी केले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूर जिल्हा, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व तायवाडे महाविद्यालय काेराडी यांच्या संयुक्त विद्यमाने “संतांनी केलेले समाजप्रबोधन” या विषयावर महावक्तुत्व स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले, यावेळी उद् घाटक श्री प्रविण पाेटे (वाहतूक नियंत्रण शाखा इंदाेरा येथील पाेलीस इन्स्पेक्टर) हाेते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे उपस्थित हाेत्या, प्रमुख अतिथी श्री.हरीश देशमुख श्री.सुरेश झुरमुरे ,सौ.छाया सावरकर (अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समीती ,नागपूर )डॉ.किशोर घोरमाडे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक तायवाडे कॉलेज हे व्यासपीठावर उपस्थित हाेते, या वेळी श्री प्रवीण पोटे यांनी आपले अनुभव कथन करतांना समाजात अंधश्रद्धा कशी पसरते ते सांगितले तर डॉ शरयू तायवाडे यांनी संतांनी समाज प्रबोधन करतांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य कसे केले हे पटवून दिले, शिवाय संत साहित्यात समाज परिवर्तनाची मराठी ताकत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.श्रावण खूदरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.वर्षा वैद्य यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.प्रेरणा थोरात यांनी केले .या महावक्तुत्व स्पर्धेत वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी सहभाग घेवून पारितोषिक पटकाविले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज