*अॅड. प्रकाश आंबेडकरांची “महाराष्ट्र बंद” ची भूमिका घटनाबाह्य – अॅड. मुकुंद खैरे*
*इंदुमिलच्या पुतळ्यास विरोध ही दुर्दैवी बाब!*
*नागरिकत्व कायदा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही*
गौतम धोटे :- कोरपना
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी CAA, NRC व इतर मुद्द्यावर 24 जानेवारी रोजी पुकारलेला “महाराष्ट्र बंद” घटनाबाह्य आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणा विरुद्ध आहे. अशी प्रतिक्रिया समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक अॅड. मुकुंद खैरे यांनी व्यक्त केली अशी माहीती आघाडीचे जेष्ठ नेते मारोती लोखंडे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. खैरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हटले आहे की, बाबासाहेब आंबेडकरांनी घटना सभेतील भाषणात “बंद पाळणे, रस्ते अडविणे, जाळपोळ करणे” अशा प्रकारची आंदोलने संविधानाला कमजोर करतात. त्यामुळे देशात अराजकता, बेबंदशाही निर्माण होते. त्याचा परिणाम संविधानावरील लोकांचा विश्वास कमी होईल. असा गंभीर इशारा दिला होता. आज नागरिकत्व कायद्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात 22 जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. घटनेनुसार सरकारचा कायदा वैध की अवैध ठरविण्याचा अंतिम अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. असे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला आहे असा आरोप अॅड. खैरे यांनी केला. मागे भीमा कोरेगाव प्रकरणी अॅड. आंबेडकरांनी पुकारलेल्या “बंद” मुळे 22 हजार आंबेडकरी तरुणा विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते .परिणामी आज ते सरकारी नोकरीपासून वंचित झाले आहे. याचे भान “बंद” पाळणाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. असे आवाहन अॅड. खैरे यांनी केले आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर एक वकील असल्याने त्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात कायदा रद्द करण्यासाठी जायला पाहिजे. अॅड. मुकुंद खैरे सुप्रीम कोर्टात याचिकेच्या सपोर्टसाठी इंटरवेशन दाखल करणार आहोत. तसेच जनतेनी सुप्रीम कोर्टात पोस्टकार्ड वर निवेदने पाठवावी, यासाठी दहा हजार निवेदने अॅड. खैरे यांनी तयार केले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी नागरिकत्व कायदा चाळीस टक्के हिंदूच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अॅड. खैरे यांनी म्हटले आहे की, सदर कायदा देशातील कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातील मुस्लिमांना सदर कायद्याद्वारे भारताचे नागरिकत्व मिळणार नाही, असे कायद्याचे म्हणणे आहे. मात्र सदर कायदा भारतीय संविधानाचे “धर्मनिरपेक्षता” आणि “नागरिकत्व” प्रकरण-2 चे उल्लंघन करते. त्यामुळे संविधान विरोधी कायदा रद्द करण्यासाठी जनतेने सुप्रीम कोर्टात पोस्टकार्ड द्वारे आपले निवेदन पाठवावे, असे आवाहन अॅड. खैरे यांनी केले आहे.
इंदुमिल येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या 350 फुट उंचीच्या पुतळ्याला प्रकाश आंबेडकरांनी केलेला विरोध ब्राह्मणवादी प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे आहे. अशी टीका अॅड. खैरे यांनी केली असुन सरकारला पुतळ्याच्या समर्थनार्थ लाखो जनतेच्या भावना अॅड. खैरे कळवणार आहे. पत्रकार परिषदेला समाज क्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृपा सागर बोरकर, उपाध्यक्ष रविकुमार वाघमारे, संघटक प्रा. भानुदास पाटील, तालुका अध्यक्ष भिमराव चाफले इत्यादिंची आदीची उपस्थिती होती.
Maharashtra News Media सच की आवाज