नांदाफाटा येथे सविधान सनमान मेळावा मोठ्या उस्वहात संपन्न
हिंसक आंदोलने आम्हाला थांबवावी लागेल
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील नांदाफाटा येथे सविधान सन्मान मेळावा आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतिने आयोजित सविधान सनमान मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.अॅड.मुकुंद खैरे यांनी आपल्या सुमारे पावणे दोन तास केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधाना द्वारे निर्माण केलेली कायद्याची व्यवस्था आम्हाला अधिक मजबूत करावी लागेल व संविधानाच्या सुरक्षेसाठी असनदशीर आंदोलने जसे बंद पाळणे, रस्ते अडविणे, हिंसक आंदोलने आम्हाला थांबवावी लागेल. या संदर्भात डॉ. आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषनातुन असनदशीर आंदोलने म्हणजे बेबंदशाहीचे उगमस्थाने होय त्यामुळे राज्यघटनेवरिल लोकांचा विश्वास कमी होईल असा गर्भीत इशारा दिल्याची आठवण याप्रसंगी प्रा.अॅड.खैरे यांनी करून दिली. 15 ऑगस्ट चा तिरंगा देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर 26 जानेवारीचा तिरंगा देशातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी फडकविण्यात आला असल्याने 26 जानेवारीला सुद्धा 26 नोव्हेंबर प्रमाणे संविधानाचे जागरण होणे गरजेचे आहे. असे अॅड.खैरे यांनी पटवुन दिले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भात बोलतांना त्यांनी सांगितले की सदर कायदा देशातील कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर देशाच्या संविधानाच्या नागरिकत्व प्रकरण- 2 व धर्मनिरपेक्षता मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध असल्याने सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेला सपोर्ट साठी जनतेनी पोस्टकार्ड वर सदर कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाला निवेदन पाठवावे. असे आवाहन याप्रसंगी अॅड. खैरे यांनी केले.
यावेळी पाहुण्यांचा परिचय प्रा भानुदास पाटील यांनी करून दिला.प्रास्ताविक मारोती लोखंडे.यांनी केले. या सविधान सन्मान मेळाव्याचे अध्यक्ष कनिष्क ताकसांडे होते. प्रमुख पाहूने भिमदास गायकवाड. राहुलदेव भगत . महेंद्र पाटील. भिमराव चापले. रूषीजी वाघमारे. गौतम भसारकर.ज्योतीताई बोरकर. शिलाताई धोटे . सुनीताबाई चांदेकर . समिधा गावंडे.गिताताई जुल्मे. वंदना बढोले. चंदाताई आडोळे.आदिची उपस्थिती होती. तर सूत्रसंचालन सहसंयोजक ज्योतीताई बोरकर. यांनी सांभाळले. आभार भानुदास पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता बुध्दगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संयोजन समितीचे सिध्दार्थ करमनकर इत्यादींनी परिश्रम घेतले.
Maharashtra News Media सच की आवाज