*लोकशाहीत लोकमताला मुल्य असते :भाई जगताप|*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
नागपुर– या निवडणुकीचे मुख्य नायक हे मूळ रुपात महाराष्ट्राचे मूख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे राहिले आहे.परंतु राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांची भूमिका सुध्दा तितकीच महत्वाची आहे सोबतच २०१४च्या विधानसभा निवडणूकीचे उदाहरण देतांना त्यांनी म्हटलेकी तत्कालिन निवडणुकीमध्ये मोदी मॉडेल आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया यांची भूमिका महत्वाची होती तरीही२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाल्याने त्यांचे जनमत कमी झाल्याचे दिसून येते.असे या राष्ट्रीय परिषदेच्या उद् घाटनप्रसंगी उद् घाटक म्हणून महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चे समग्र विश्लेषण करतांनाआपल्या वक्तव्यातून व्यक्त केले.
तायवाडे महाविद्यालय महादूला
– कोराडी येथे आज दिनांक २९/०२/२०२० शनिवारला
राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद (विदर्भ प्रांत)नागपूर आणि तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र विधानसभा निवडणूक विश्लेषण २०१९ “या विषयावर एक दिवसिय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्या गेले .या परिषदेत उद् घाटक म्हणून भाई जगताप,विधान परिषद सदस्य मुंबई , महाराष्ट्र, बिजभाषक श्रीमान सूहास पळशीकर,वरिष्ठ राजकीय विश्लेषक,पूणे ,प्रमुख वक्ता श्री.प्रसाद काथे मुख्य संपादक,जय महाराष्ट्र ,न्यूज चॕनल ,मुंबई,श्रीमान देवेंद्रजी गावंडे,संपादक लोकसत्ता नागपूर ,कॉग्रेस पक्ष प्रवक्ता श्री.अतूल लोंढे,डॉ.अलका देशमुख ,अध्यक्ष,राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद (विदर्भ प्रांत),डॉ.शरयू तायवाडे , प्राचार्य,तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी यांच्या उपस्थितीत व सच्चिदानंद शिक्षण संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या
परिषदेचे प्रास्ताविक राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्ष डॉ.अलका देशमूख यांनी परिषदेच्या भुमिकेसंबंधी आपले विचार व्यक्त केले . महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयु तायवाडे यांनी संस्था आणि महाविद्यालयाची यशस्वी परंपरांची सर्वांना ओळख करुन दिली.
या परिषदेचे बिजभाषक डॉ.सुहास पळशिकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९ चे विश्लेषण करतांना सांगितलेकी ही निवडणुक राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक आणि आर्थिक स्तंभावर आधारीत होती.या निवडणुकीत जातिय विश्लेषणाचा आधार घेवून त्यांनी म्हटले की ज्या राजकीय पक्षाला मराठा व कूणबी समाज आणि इतर मागास जातींचे पाठबळ मिळते,त्या पक्षाला बहूमत मिळते,परंतु या निवडणुकीत या सामाजिक वर्गांचे मत कोणत्याही एका राजकीय पक्षाला न मिळता त्याचे विभाजन झालेले दिसले.यानतंर परिषदेच्या उद् घाटन समारंभाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाला शुभेच्छा देतांना म्हटले की या परिषदेच्या आयोजनामूळे आम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९चे सार्थक विश्लेषण ऐकाण्याची संधी मिळाली.या उद् घाटन सत्राचे सुत्रसंचालन इग्रंजीविभाग डॉ.वर्षा वैद्य यांनी केले . पहिल्या सत्रात दैनिक लोकसत्ताचे निवासी संपादक श्री.देवेंद्र गावंडे हे अध्यक्ष म्हणून तर जय महाराष्ट्र या न्युज चॕनलचे मुख्य संपादक आणि राजकीय विश्लेषक श्री.प्रसाद काथे प्रमूख वक्ता म्हणून उपस्थित होते.श्री.प्रसाद यांनी आपल्या वक्तव्यातून वर्तमान निवडणुकीवर आधारीत राजकीय व्यवस्थेपासून देशाची लोकशाही व्यवस्था वाचविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे,यासाठी राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांची भूमिका महत्वाची आहे,कारण तेच विद्यार्थ्यामध्ये लोकशाही मूल्ये जागृत करु शकतात. आपल्या अध्यक्षिय भाषणातून देवेंन्द गावंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक२०१९ च्या विश्लेषणात म्हटले की ही निवडणूक विदर्भ प्रांतासाठी काही चागंली नव्हती,महाराष्ट्रात वंचित आघाडीने कांग्रेसचे खूप नुकसान केले,आज कॉंग्रेसला बूस्टर डोज देण्याची गरज आहे.भाजपा केवळ घोषणाबाजीत मर्यादित झाली आहे.वास्तविक राजकीय सत्तेला बळकटी देण्यात भाजपा असफल झाली आहे,परंतु भविष्यात लोकमतानूसार सरकार स्थापन करण्याचा अंदाज नाकारता येत नाही.
या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपिय सत्रात अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयु तायवाडे या होत्या.तर प्रमुख अतिथी राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद (विदर्भ प्रांत) चे उपाध्यक्ष डॉ.रतन राठोड,डॉ.संजय गोरे,सचिव डॉ.शरद सांबारे आणि या परिषदेचे समन्वयक डॉ.वकील शेख इ.मान्यवर उपस्थित होते .सर्वांनी परिषदेसंबंधी आपली मते मांडली. व विषयासंबंधी चिंतन व मंथन करण्यात आले.या सत्राचे सुत्रसंचालन डॉ.कोमल ठाकरे यांनी केले.तर या एक दिवसिय परिषदेत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार डॉ. वकील शेख यांनी मानले.या परिषदेला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बहूसंख्य प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज