आतातरी कुहीची नगरपंचायत दखल घेईल का !

कुही– कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देश हादरले आहे. कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे सर्वच स्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू आहे. ,राज्य सरकार तर्फे आधी राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या त्या लागोपाठ जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या व आता मात्र लॉकडाऊन व संचारबंदी करून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे पण कुही शहरात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहेत शहरात अजूनही बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे . शहरात येणारे रस्ते अजूनही बंद केले नसून बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे शहरातील नागरिकांना संसर्गाची भीती वाटत असून यामुळे कुहीकराना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आठवडी बाजार बंद असल्याने शहरातील गुजरी बाजारात प्रचंड गर्दी होत आहे यावर उपाय म्हणून नगरपंचायत प्रशासनाने प्रत्येक प्रभागात किंवा परिसरात भाजीपाला व्यावसायिकांना जागा ठरवून द्याव्या यामुळे लोकांना गर्दी न करता जीवनावश्यक भाजीपाला जवळच उपलब्ध होईल.
आतातरी नगरपंचायत प्रशासन व मा. मुख्याधिकारी याची दखल घेऊन यावर लवकरात लवकर उपाययोजना करतील का असा सवाल सर्वसामान्य कुहीकर करीत आहेत .
Maharashtra News Media सच की आवाज