*अवकाळी पावसाने झालेली शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व कंत्राटी कामगारांचे साप्ताहिक १५ दिवसाचे वेतन देण्यात यावे*
*माजी आमदार अँड संजय धोटे यांची मा.जिल्हाधिकारी यांच्या कडे इमेल द्वारे मागणी*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना– कोरोना विषाणू मुळे निर्माण झालेली महामारी परिस्थितीत केंद्र शासणाने व महाराष्ट्र शासणाने संसर्गरोकण्यासाठी व सामाजिक अंतर राखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे.
तसेच तुर्थ २१ दिवसाकरिता संचारबंदी जाहर केली आहे.
त्या मुळे सर्वप्रकारचे व्यवहार पूर्णपणे थकीत झाले आहे.
१.सर्व प्रकारच्या वसूलपात्र बँकेच्या कर्जाचे परत फेडीस मुदत वाढिची नोंद बँकेने न घेतल्या बाबत.
चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा व कोरपना तालुक्यातील उद्योग क्षेत्र कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे साप्ताहिक व १५ दिवसाचे वेतन दिले नसल्याबाबत,अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे शेतमालाचे झालेले नुकसान संदर्भात स्थानिक पातळीवर चौकशी करून नुकसानाची नोंद व कार्यवाही व्हावी.
शासणातर्फे कर्जाचे मुदत वाढ करून देण्याचे आश्वासन दिले आहे परंतु सदर बँकांना याबाबत सूचना पत्र प्राप्त न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा मनात संभ्रम झाल्या मुळे शेतकर्यानी एकच बँकेत गर्दी केल्याचे निदर्शनास येत आहे तरी या बाबत आपण सबधीत बैकेला सूचना देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी केली.
चंद्रपुर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे साप्ताहिक व १५ दिवसाचे वेतन दिले नसल्याबाबतचे तक्रारीवरून निदर्शनास आले आहे.
राजुरा क्षेत्रातील कोळसा उधोग, सिमेंट कंपनी मधील ठेकेदारांकडे कामकरीत असलेल्या कंत्राटी कामगारांचे वेतन जीवनाशक वस्तू खरेदी करण्या करिता आवशक असल्याने ते वेतन त्यांना मिळण्यात यावे या बाबत संबंधित कंपनीला आदेश द्यावे व पुढील संचारबंदी कालावधी मध्ये त्यांना वेतन देण्यात यावे.
अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या शेतमालाचे झालेले नुकसान सतत होत असल्याने तसेच शेतकऱ्यांच्या शेतमाल सद्यस्थितीत शेतात असल्याने खराब झाल्याने त्यांचे अतोनाथ नुकसान झालेले आहेत या संदर्भात स्तानिक पातळीवर तलाठी,पोलीसपाटील,सरपंच, तंटामुक्ती समिती द्वारा चौकशी करून नुक्सांचे नोंद घ्यावी व कार्यवाही व्हावी या बाबत संबंधिताना सूचना द्याव्यात जेणेकरून शेतकर्यांना मदत मिळणे सोयीचे होईल.
या बाबत शेतकऱ्यांचे शेतमालाचे झालेले नुकसान भरपाई मिळण्यास शासणास माहिती द्यावी.
या बाबतची माहिती राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर याना ई-मेल द्वारे देण्यात आली.
तरी गाव पातळीवर सर्व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी,पंचायत समिती सदस्य,सरपंचांनी, तंटामुक्ती सदस्यांनी याची नोंद घेऊन त्याचे अहवाल ग्रामपंचायतीत नोंद करून ठेवावे जेणे करून अवकाळी पावसाचे नुकसानीची नोंद ग्रामपंचायतीत असेल आणि पुढील कार्यात मदत होईल.
Maharashtra News Media सच की आवाज