*पाटणसावंगी SBI बँकमध्ये गर्दी…*
*सोशल डिस्टन्स, लॉकडाऊनचा उडतोय फज्जा !*
*विशेष प्रतिनिधी पाटनसावंगी*
*पाटणसावंगी–कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी केंद्र शासनाकडून संचारबंदी लागू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन करण्याची घोषणा केली. इतकी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा पाटणसावंगी परिसरात नागरिकांडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केल्या जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचीही पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.*
*असे असताना शहरात मात्र आज अनेक नागरिक वाहनांनी, पायी फिरताना आढळून आले.*तसेच बँकमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्स कोठेही दिसून आला नाही.नागरिक मनाला वाटेल त्याप्रमाणात रस्त्यावर ये-जा करताना आढळून आले. जणूकाही लॉकडाऊन उघडल्याचा अनुभव आज आला.*
*”कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवांना त्यातून वगळण्यात आले आहे.बँकांमध्ये ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवून उभे राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र बँकमध्ये सोशल डिस्टन्स ठेवले जात नाही नागरिक एकापाठोपाठ एक उभे आहेत. यामुळे “कोरोना’ चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढली आहे*
*रविवारी (ता.5) व सोमवारी (ता.6 )बँकांना सुटी होती. आज मात्र ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.*
*बँकेनेही या ग्राहकांना कोरोना बाबत काळजी घेण्यास सांगितले नसल्याचे चित्र होते म्हणूनच ग्राहक अगदी एकमेकांजवळ उभे होते.स्टेट बँकमध्ये नागरिकांच्या रांगा दिसून आल्या*
*सर्व आदेश गेले वाऱ्यावर*
*पाटणसावंगीतील काही नागरिकांकडून स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता तोंडाला मास्क न लावता गावातून दिवस रात्र कोणाचीही भीती न बाळगता मनसोक्त फिरत आहेत. परिणामी संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजार असल्याने जमावबंदी व संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. दरम्यान परिसरातील ग्रामपंचायती व संबंधित विभागाने आपल्या स्थरावरून वारंवार दवंडी, लाऊडस्पीकर व इतर प्रसार माध्यमाव्दारे सूचना दिल्या आहेत. असे असताना देखील नागरिक संचारबंदी व जमावबंदीची पायमल्ली करताना दिसून येत आहेत.*
*सुरक्षित अंतर न ठेवता चौकाचौकात बसून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत आहेत. गावातील पोलिस प्रशासन सुद्धा वारंवार नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नका अशा सूचना व विनंती करीत आहेत. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत विनाकारण दुचाकीवरून फिरत आहेत. तालुक्यातील गावे व लोकसंख्येच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाची मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने, रिकामटेकड्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.*
*पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे*
*संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल. मास्क न बांधता नागरिकांनी गावात फिरू नये, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.अशी विनंती निशांत फुलेकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाटणसावंगी यांनी केली आहे*
Maharashtra News Media सच की आवाज