Breaking News

*गडचिरोली जिल्हयात चार तालुक्यांत शिवभोजन योजनेला सुरुवात*

गडचिरोली जिल्हयात चार तालुक्यांत शिवभोजन योजनेला सुरुवात

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली: राज्य शासनाच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने चार तालुक्यांमध्ये शिवभोजन शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

आरमोरी,कुरखेडा व देसाईगंज याठिकाणी शिवभोजन देण्यास सुरूवात झाली असून, गडचिरोली तालुकास्थळी जानेवारी महिन्यात शिवभोजन केंद्र उघडण्यात आले होते. जिल्हयाच्या ठिकाणी २०० थाळ्या, तर तालुका निहाय ७० थाळयांची मर्यादा शिवभोजन थाळी योजनेत करण्यात आली होती. कोराना संसर्गाच्या अनुषंगाने संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू लोकांना अन्न मिळावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता अनलिमीटेड थाळया देण्यात येत आहेत. गरजू लोकांना अन्न मिळावे या उद्देशाने सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत ही सुविधा गरजू लोकांसाठी उपलब्ध आहे.

*बेरोजगाराना रोजगार ची संधी उपलब्ध*

जिलहयातील उर्वरीत ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक पुरवठादारांनी विहीत नमुन्यात तालुकास्तरावर पुरवठा शाखेकडे अर्ज दाखल करावेत. त्या अर्जांची तातडीने छाणनी करून योजनेला गती दिली जाणार आहे. शिवभोजन केंद्रात स्वच्छ टेबल खुर्च्यां, वॉश बेसिन, हॅण्ड वॉश, पेपर नॅपकिन व सॅनिटायजरची व्यवस्था असावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …