*श्वास कोंडला भोवतालचा , पंचनामा करा विजकेंद्राचा अन कोळसा खाणीचा*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेड़ा– जळणाऱ्या कोळश्या तुन निघणारा मिथेन वायू आणि कार्बनडाय ऑक्साइड वायू हा खापरखेडा परिसरात हवेत मोठ्या प्रमाणात संचार करीत आहे. यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित झाले आहे. जळत असलेल्या कोळशाच्या धुरही बाहेर निघून हवेच्या प्रवाहाने वातावरणात पसरत आहे यामुळे हवेत वायू आणि धूर पसरल्याने परिसरातील हवाच प्रदूषित झाली आहे. यामुळे लोकांचा श्वास गुदमरत आहे. हा विषारी वायू आणि धूळ नाकावाटे लोकांच्या शरीरात जात आहे. परिणामी परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिनामही दिसायला सुरुवात झाली आहे. जन्मजात बालके आणि वयोवृद्ध व्यक्ती यांच्यावर याचा परिणाम अधिक होत आहे.
खापरखेडा परिसरातील पोटा(चनकापूर) ग्रामपंचायतच्या वॉर्ड नंबर एक भागात गेल्या 2 वर्षांपासून हवेत उग्र वास असल्याचे लोकांच्या तक्रारी बऱ्याच दिवसापासून होत्या. नेमका या वायूचे उत्सर्जन कुठून होत आहे याची माहिती घेतली असता खापरखेडा विजकेंद्राचा 210 मेगावॅट विजकेंद्रातून हा वायू उत्सर्जित होत असल्याचे समोर आले. खापरखेडा विजकेंद्राचा स्वीच यार्ड च्या मागील भागाला मोठ्या प्रमाणात दगडी कोळश्याची चुरी खाली भागात 2 ते 3 वर्षा पासून ठेवण्यात आलेला आहे. कोळसा हा ज्वलनशील आहे तापमान वाढल्याने कोळसा पेट घेतो आणि पेट घेतला नंतर त्यातून वायू आणि धूर बाहेर पडून वातावरणात मिसळतो. येथून 100 मीटर अंतर नंतरच खापरखेडा येथील अन्नमोड आणि चनकापूर हा भाग आहे येथील लोकसंख्या 9 हजार आहे. हवेची दिशा बदलताच वायू या परिसराकडे हवेच्या माध्यमातून येउन लोकांच्या शरीरात जात आहे यामुळे ते अनेक रोगांना बळी पडताहेत. 2 वर्ष पासून हा प्रकार सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या भागातील लोकांची तपासणी करावी. धुरीतून निघणारे सूक्ष्म कन हानिकारक आहेत. त्यामुळे ब्लॅक लंग डिसीज , सिलिकॉसिस , निमोकनिओसीस , व क्रोनिक ब्रोकांयटीस , अस्थमा , टीबी सारखे रोग होण्यास हानिकारक आहेत. येथील बहुतांश लोकं श्वसनाच्या रोगाने ग्रासले आहेत. त्यात सी.ओ.पी.डी, निमोकोनिओसिस, सिलीकॉसीस, ए.पी.डी, ब्रोन्कीटीस, अस्थमा, टीबी अश्या रोगांचा समावेश आता. काहींना हायपरटेन्शन, मायग्रेन, हेमिप्लेजीया, एपिलेप्सी, कॅटरेक्ट, बहिरेपणा, त्वचारोग, रोग आढळत आहे . कोळसा हा वनस्पतीपासून तयार निर्माण झालेला सेंद्रिय प्रकारचा स्तरीत खडक आहे. हा खडक बिटयूमन जातीचा ज्वलनशील कोळसा आहे आणि यामध्ये कार्बन , हायड्रोजन , ऑक्सिजन या सारख्या घटकांच्या सयुगाने बनलेला आहे. यात , मारकॅसाइट किंवा पायराईट या सारख्या खनिजांच्या स्वरूपात गंधकाची अशुद्धी असते. या व्यतिरिक्त कोळश्यात इतर अनेक रासायनिक पदार्थ गौण प्रमाणात असतात. परुसरात आधीच कोळसा खाणींचा धुरळा आणि त्यात औष्णिक वीज केंद्रांची भर या वातावरणात जीवन जगणं खडतर बनतं.
येथेही आहे हा प्रकार आणि वातावरण
कोळश्याचे चुरी खापरखेडा दहेगाव मार्गावर मिलन चौक येथेही आहे. खापरखेडा विजकेंद्रातील ही कोळश्याचे चुरी खरेदी करून रस्त्याच्या बाजूला ठीक ठिकाणी साठवून ठेवले आहेत. येथेही असाच प्रकार सुरू असल्याने या परिसरातील 8 हजार लोक प्रभावित झाले आहेत. या प्रकरणाबाबत ग्रामपंचायत पोटाने 2 वर्षा पूर्वीच सावनेर तहसीलदार यांना पत्र देऊन कारवाहीची मागणी केली होती. नव्याने सुरू झालेली सिंगोरी आणि भानेगाव खुल्या कोळश्याचे खदाणीतूनही निघणारा वायू हवेत पसरल्याने उग्र वास तेथील लोकांना जाणवत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या भागाची पाहणी करून पंचनामा करून कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी भीमराव आवळे माजी उपसभापती पंचायत समिती सावनेर यांनी केलेली आहे.
कोट
प्रकाश खंडारे मुख्य अभियंता : कोळश्याची चुरी ची पाहणी करण्यास कर्मचारी पाठवलेले आहेत. जळणारा कोळसा विझवण्यात येईल. लॉकडाऊन संपल्यानंतर ओक्शन करून चुरी लिफ्ट करून बाहेर पाठवल्या जाईल.
Maharashtra News Media सच की आवाज