Breaking News

ग्रामीण भागातील लाईट चा काय भरोसा नाय..! बोरगाव विधुत स्टेशन वरून पुरवठा होणाऱ्या गावाचा विधुत पुरवठा सतत होतो खंडित

ग्रामीण भागातील लाईट चा काय भरोसा नाय..!

बोरगाव विधुत स्टेशन वरून पुरवठा होणाऱ्या गावाचा विधुत पुरवठा सतत होतो खंडित

विशेष प्रतिनिधि

खात- मौदा तालुक्यातील बोरगाव विधुत स्टेश वरून होत असलेल्या विधुत पुरवठ्यात सतत काही ना काही कारणांनव्ये वी खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे.सद्या कोविड १९ मुळे नागरिकांना घरी राहावे लागत असल्याने वीज खंडित होत असल्यास नाहक त्रास सहन करावा लागतोय एकीकडे आपला विभाग सतत या संक्रमनाच्या काळात सुध्दा कामाची तत्परता दाखवून कर्तव्य पुर्ती करतांना दिसतात याबाबद पुरावे तितके कमी आहे मात्र या सतत होत चाललेल्या खंडित वीज पुरवठा च्या तक्रारीबाबत नागरिकांचा रोष वाढत आहे याची दखल घेऊन पिपरी, खंडाळा, चारंभा, रेवराल, मारोडी, नागरिकांना दिलासा देण्यासाठी जी प सदस्य योगेश देशमुख, विक्की साठवणे तालुका अध्यक्ष युवक कांग्रेस, स्वप्नील श्रावणकर प स सदस्य, चक्रधर गभने उपसरपंच पिपरी खंडाळा, शुभम तिघरे अध्यक्ष शहर युवक कांग्रेस, सुनील श्रावणकर, महासचिव युवक कांग्रेस यांनी लेखी तक्रार कार्यकारी अभियंता विधुत मंडळ व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना केली आहे

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …