Breaking News

*आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन उपलब्घ अन्नधान्याच्या कीटचे मुल तालुक्यात ठिकठिकाणी गोरगरीबांना वितरण.* *अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सॅनिटयझर व माॅस्कचेही केले वाटप.*

*आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन उपलब्घ अन्नधान्याच्या कीटचे मुल तालुक्यात ठिकठिकाणी गोरगरीबांना वितरण.*

*अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सॅनिटयझर व माॅस्कचेही केले वाटप.*

कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे

चंद्रपूर :-संपूर्ण जगावर कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने लॉकडाऊन घोषित झाल्यापासून ते आजपर्यंत आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गोरगरिब, निराधारांना मदतीचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. जिल्ह्यातही कुठलाचं गरीब उपाशी राहणार नाही या काळजीपोटी त्यांनी स्वतः लक्ष देण्याच्या सूचना भाजपच्या लोकप्रतिनिधीना दिल्या आहेत. आणि जिल्ह्यातिल गोरगरिबांपर्यंत मदत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे.
याच माध्यमातुन आज मुल तालुक्यातील चिमढा, डोंगरगाव, चिखली, चितेगाव, मारोडा आणि आदर्शखेडा येथे जीवनावश्यक वस्तू व धान्याच्या उपलब्ध किट्सचे वितरण करण्यात आले. तसेच अशा कठीण परिस्थितीत खबरदारी परतण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी सॅनिटयझर व मास्कचेही उपयोग करावे. आणि त्यामाध्यमातुन सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. म्हणून जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सॅनिटयझर व माॅस्कचे वाटप केले.
यावेळी त्यांसमवेत, उत्तम लेनगुरे, मुकेश गेडाम, नामदेव खोब्रागडे, अर्चना बालमवार, हरीभाऊ गोहणे, पत्रुजी दवंडेवार, प्रमिला कडस्कर, विनोद काकडे, प्रमोद कडस्कर, विश्वनाथजी काकडे, सचिन गुरनुले, रामु उत्तरवार यांसह आदी मंडळी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …