कालव्या वरील फुटलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात
पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे होणार नुकसान.
रेवराल-खरबी कालवा दुरुस्ती कडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष
कालव्याची तात्काळ दुरुस्ती करा:शेतकऱ्यांची मागणी.
उपजिल्हा प्रतिनिधी- तुकाराम लुटे
मौदा : शेतकऱ्यांच्या शेत पिकाला पाणी मिळावा यासाठी कालव्यांचे जळे पसरविण्यात आले. परंतू हेच कालवे नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना फायदे ऐवजी नुकसानदायक ठरते की काय असे चित्र दिसत आहे.

असाच प्रकार रेवराल-खरबी या कालव्यातून पाणी शेतकऱ्यांना मिळत असते. परंतु तालुक्यातील धानला शिवारातील रेवराल कडून खरबी कडे जाणारा पाण्याच्या कालव्यावरील एक सिमेंटचा बंधारा फुटला असल्याने या धानला परिसरातील काही शेतकऱ्यांची कमीत कमी दोनशे एकर शेती धोक्यात येण्याची शक्यता बळावली असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
धानला शिवारातून जाणारा हा मोठा कालवा आहे. याच कालव्यावरील एका ठिकाणी बंधारा फूटलेला आहे. हा बंधारा फुटल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी न थांबता सरळ तो पाणी निघून जाईल. पाणी न थांबल्याने येथील 200 एकर शेतातील पीक धोक्यात येणार असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवणार आहे. सदर बंधारा दुरुस्ती न झाल्यास शेतकरी मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालव्यातून अनेक शेतकऱ्यांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सिमेंटच्या पाहिल्या टाकून पाणी घेत असतात. त्या तुटलेल्या कालव्या वरील बंधाऱ्याचे तत्काळ संबंधित विभागाने दुरुस्ती करावी अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज