Breaking News

*बेलोना (बी. पी. एल) घरकुल योजनेचा घोळ* *सर्वेक्षण करणारे जबाबदार* *बेलोना पंचायत समिती सर्कल सदस्या आरघोडे करीत आहे गरिबांना घरकुल मिळून देण्यात प्रयत्न*

*बेलोना (बी. पी. एल) घरकुल योजनेचा घोळ*

*सर्वेक्षण करणारे जबाबदार*

*बेलोना पंचायत समिती सर्कल सदस्या आरघोडे करीत आहे गरिबांना घरकुल मिळून देण्यात प्रयत्न*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
*बेलोनाही नरखेड तहसील मधील मोठी ग्राम पंचायत असून या ग्राम पंचायत मधे गेल्या कित्येक वर्षा पासून घरकुल योजने बाबत गावकरी जनतेची मोठी नाराजी आहेत .*
*गावकरी जनतेचे म्हणने आहे की हा सर्वेक्षण केला तो कोणी, आणि केव्हा केला ,या मधे आमचे नाव नाहीत तर सर्व मोठ्या माणसांची नावे आहेत.त्यामुळे सर्व मजूर आणि मध्यम वर्गीय जनतेने या सरवेवर नाराजी व्यक्त केली आहे.ज्या गोर गरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या गरीब जनतेचे नाव कुठेच दिसत नाही आणि ज्या व्यक्तीन कडे राहाला पके घरे आहे ,शेत जमीन आहे अश्या मोठ्या व्यक्तीची नावे या यादीमध्ये आहेत.कष्ट करून .मोल मजुरी करून पोट भरणारे आणि आपला प्रपंच चालवणाऱ्याला या योजनेचं लाभ मिळत नसल्याने गावकरी जनतेची शासकीय प्रशासनावर नाराजी पसरली आहे. सर्व साधारण जनतेला आशा अस्ते आपले पकें घर असावे त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कडे 26 जानेवारीच्या, 15क्षआगष्टच्या आमसभेत त्यांना ऐक आशेची किरण म्हणून ते आपले अर्ज देत्तात. पण इथे ग्रामपंचायत मधील सभेच्या ठरावात त्या अर्जांच काय केले जाते ते ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक आणि इथे थोडेफार कर्मचारी वर्गाला माहीत काय केल्या जाते .बरेच दा सभेत विषय महत्वाचे घेतले जाते पण ठराव जनतेला माहीत नसताना सुद्धा वेगळेच विषय मान्य होऊन काम केले जातात त्यामुळे गावची जनता ही ग्रामसभा असो की कुठली सभा यात जात नाही . कोरम नसताना सुद्धा बऱ्याच सभा पूर्ण झाल्या आहेत आणि कोऱ्हम 3,4,5,दिवसात ग्रामपंचायत मधे येणाऱ्या जनतेकडून सह्या केल्या जातात आणि कोऱोम पूर्ण केला जातो हे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे*.
*गावातील गोर गरीब जनतेला ग्रामपंचायत मधील सर्व योजनेचा लाभ मिळावा पण तो काही मूठभर लोकांना मुळे मिळू शकत नाही.त्यामुळे जनतेत ग्रामपंचायत बदल खूब नाराजी व्यक्त झाली आहे.*
*गावातील जनता आपले नावे घरकुल मधे आपले नाव आहे का ते पाहण्यासाठी ग्राम पंचायत मधे जातात पण त्यांना त्याचे नावे न दिसल्यास बिचारे उदास होऊन येतात तरी त्यांना ग्रामपंचायत कुठल्याच पद्धतीचे मार्गदर्शन केल्या जात नाही*

*मा.ना.महाराष्ट्राचे गृहमंत्री,आणि काटोल विधान सभा शेत्राचे आमदार अनीलबाबु देशमुख यांना विनती करत आहे की तुम्ही या प्रकरणात लक्ष देऊन आम्हा गरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा . आणि गावकरी जनतेचा उडत असलेला ग्रामपंचायतीवरील विश्वास टिकून राहण्यात यावा .आणि गरजू जनतेला या योजनेचा लाभ मिळावा आणि या मोठ्या लोकांची नावे कापून तिथे अत्यंत गरीब जनतेची नावे देण्यात येऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुन्हा गावातील सर्व करण्यात यावा जेणेकरून गावाचा विकास होऊन गावकरी जनतेच समाधान होईल*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …