*आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे वर्ष सहावे विशेष*

*योगतज्ञ दिपक येवले*
नागपुर– *देशाचे प्रधानमंत्री मा नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभा येथे 27 सप्टेंबर 2014 ला जे भाषण केले होते, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजन करावे म्हणजे योग दिवसाचा उल्लेख होता.पहिला योग दिवस हा आयुष्य मंत्रालयाने 21 जून 2015 ला राजपथ इथे साजरा केला होता. या प्रथम योग दिवसां मध्ये 35 हजार 985 योग साधकांनी येथे योग केला. या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसात एकंदरीत 84 देश सम्मिलित होते त्यात विश्व रेकॉर्ड गिनिस बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपल्या भारताचा होता. ज्यामध्ये जास्तीत जास्त योग प्रतिभागी सामील झाले होते.*
*योग दिवसाचे महत्त्व हे, आपल्या प्राचीन भारतीय संस्कृती मध्ये ऋषी मुनि ची ही अमूल्य देन आहे. योग अभ्यास, शरीर-मन, विचार, कर्म आणि आत्मसंयम याची पूर्तता करते आणि मानवांमध्ये एक सद्भाभावना, सद्विचार या सारख्या सकारात्मक दृष्टिकोण चा अवलंब करते.योग ही प्राचीन ऋषी मुनींनी दिलेली एक योग् संपत्ती आहे.*
*या संपत्तीचा वापर जगातील प्रत्येक व्यक्ती तो श्रीमंत असो, गरीब असो, व गर्भश्रीमंत असो, सायन्टिस असो, इंजिनिअर असो, डॉक्टर असो, नेता असो, शासकीय कर्मचारी असो, किंवा प्रायव्हेट जॉब करणारा असो, किंवा मजुरी करणारा मजूर असो, शेतकरी असो, विद्यार्थी असो, लहान मुलापासून तर शंभर वर्षाच्या वर असणारे म्हातारे या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद पसरवणारा व त्या व्यक्तीला युमीन सिस्टिम म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद देणारी एक अमूल्य शक्ती ही योग आहे. श्रुती परंपरा अनुसार भगवान शिव योग विद्या चे प्रथम आदिगुरू आहेत. त्यांनी हजारो हजार वर्षा अगोदर हिमालयाच्या कांती सरोवर चा किनारी पोरानिक सप्तऋषींना योग या विषयाचे ज्ञान दिले होते. या सप्तऋषी ने अत्यंत महत्वपूर्ण योग विद्या संपूर्ण एशिया, मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, आणि दक्षिण अमेरिका सहीत जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रसारित केला. आधुनिक विज्ञान संपूर्ण पृथ्वीच्या प्राचीन संस्कृतीनुसार योगाची एकसमानता संपूर्ण जगात सारखी असल्यामुळे शास्त्रज्ञ अचंबित आहे आणि ते याला एक रोचक तथ्य मानतात,जगामध्ये भारत भूमी ही एकच भूमी अशी आहे की जी योग विद्या पूर्ण प्रकारे मानते व त्याची अंमलबजावणी केली जाते, आणि आता या योग दिवसाच्या निमित्ताने जगामध्ये एकही देश असा सुटलेला नाही की जेथे योग विद्या होत नाही.*
*इतकेच नव्हे तर आपल्या वैदिक आणि उपनिषद परंपरा मध्ये शैव व वैष्णव तथा तांत्रिक परंपरा भारतीय दर्शन रामायण भगवद्गीता आणि महाभारत अशा मोठमोठ्या काव्यांमध्ये व बौद्ध आणि जैन परंपरा नुसार सर्व देशांमध्येच लोकांच्या संस्कृतीमध्ये परंपरागत योग आहे, योग हा जुन्या वैदिक काळामध्ये पण केला जात होता, याला महर्षी पतंजली ने त्या वेळेस प्रचलित केला व ग्रंथामध्ये व्यवस्थित वर्गीकृत करून जनकल्याणासाठी हे ज्ञान पतंजली योग सूत्र नावाच्या ग्रंथात क्रमबद्ध करून त्यात सार्वजनिक लोकांसाठी तो खुला केला. पतंजली ऋषी नंतर वेगवेगळ्या ऋषी आणि आचार्यांनी या योग साहित्याचे अनेक माध्यम निवडले.आणि या योगाचा महत्वपूर्ण सामान्य जनांसाठी योगदान दिले आणि संपूर्ण विश्वामध्ये याला आज लाखो लाखो लोक योगामुळे लाभान्वित होत आहेत आणि योग दिन व प्रतिदिन योग करण्यासाठी यामध्ये परमपूज्य प्रातःस्मरणीय योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेआहे.*
*योग चे आधारभूत तथ्य प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही त्याचे मन, भावना, ऊर्जा याच्या अनुसार योग्य कार्य कर्ते. याला चार विभागांमध्ये विभाजित करता येते एक कर्म योग यामध्ये आपण शरीराचा प्रयोग करतो, दुसरा ज्ञानयोग यामध्ये आपण मनाचा प्रयोग करतो, तिसरा भक्तियोग यामध्ये आपण भावना चा प्रयोग करतो, आणि चौथा क्रियायोग यामध्ये आपण ऊर्जेचा प्रयोग करतो. योग यापैकी ज्या काही क्षमतेचा उपयोग व अभ्यास केला जातो त्यात प्रत्येक गोष्टी अापसामध्ये बऱ्याच अंतरावर सर्वांमध्ये गुंफलेल्या असतात प्रत्येक व्यक्ती हा या चारही ही क्रिया चा संयोग करतो फक्त यामध्ये एकच समर्थ योग शिक्षक योग साधकाला आवश्यकतेनुसार आधारभूत योग सिद्धांताचा कसा उपयोग करायचा आहे हे सांगत असतो आणि योग अभ्यास हा समर्थ गुरू म्हणजे योग शिक्षकाच्या सानिध्या मध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे.*
*योग करताना यामध्ये अनेक साधनाचा प्रयोग केल्या जातो त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी बंध आणि मुद्रा, षटकर्म युक्ताहार मंत्रजप युक्त कर्म या साधनांचा अभ्यास जास्त केला जातो. यामध्ये आसनाचा अभ्यास शरीर आणि मन यामध्ये स्थैर्य आणण्यासाठी सक्षम आहे आसनांचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण असला तरी याला वेळाची सीमा असते . असं हे बाहेरील शरीराचे सौंदर्य व त्याला व्यवस्थित आकार देण्यासाठी केल्या जाते. प्राणायाम ही स्वास आणि प्र स्वास प्रक्रिया आहे याचा नियमित मीत अभ्यास करणे आवश्यक आहे. प्राणायामाचा नियमित अभ्यास हा नाक मुख आणि शरीर व शरीराचे अन्य चित्र शरीराचे आंतरिक व बाहेरच्या मार्गांमध्ये जागरुकता वाढवते. प्राणायाम अभ्यासात नियमित नियंत्रित आणि निरीक्षक प्रक्रिया द्वारा श्वास आत घेणे म्हणजे पूरक म्हटले जाते आणि शरीराच्या आत स्वास रोखून जर धरला तर त्याला कुम्भक म्हटले जाते नियंत्रित आणि निरीक्षण प्रक्रिया द्वारा श्वासाला बाहेर सोडणे हे रेचक म्हटल्या जाते. आणि पुढील प्राणायाम बद्दल माहिती पुढील लेखात पाहू.*
दीपक ना. येवले. नरेंद्र नगर नागपुर फोन. न 9373100862
Maharashtra News Media सच की आवाज