Breaking News

*शेतकऱ्यांचा आक्रोश बघून ग्रेडर रहाणगडाले यांनी केले शेतकऱ्यांचे पैसे परत. करवाईची मागणी !*

*शेतकऱ्यांचा आक्रोश बघून ग्रेडर रहाणगडाले यांनी केले शेतकऱ्यांचे पैसे परत. करवाईची मागणी !*

वरोरा प्रतिनिधी :- जुबेर शेख

महाराष्ट्राचे शेतकरी धोरण हे आता अधिकारी यांचे भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून शेतकऱ्यांची चहूकडे आर्थिक लूट होत असल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना आता खुद्द खासदार बाळू धानोरकर यांच्या वास्तव्य असणाऱ्या व त्यांच्याच पैनेल ची बाजार समिती वरोरा मधे सत्ता असताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सद्ध्या संपूर्ण महाराष्ट्रासह वरोरा येथील बाजार समिती मधे चना खरेदी नाफेड तर्फे होत असताना रोज शेतकऱ्यांच्या किमान ५०चना विक्रीकरिता बाजार समिती मधे येत आहे. परंतु नाफेड च्या ग्रेडर रहाणगडाले यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याच्या नादात केवळ सहा ते सात गाड्यांचा चना खरेदी होत असल्याची माहिती असून बाकी गाड्या प्रतीक्षेत असतात आणि ज्या शेतकऱ्यांनी ग्रेडर ला पैसे दिले त्यांचाच चना खरेदी करण्यात येत असल्याने हा प्रकार काही शेतकऱ्यांनी समोर आणल्यानंतर काही राजकीय पदाधिकारी आणि पत्रकारांनी बाजार समिती कडे धाव घेतली आणि प्रत्यक्ष ग्रेडर रहाणगडाले यांचा घेराव केला. परंतु अगोदर “तो मी नव्हेच” या नाट्ट्यानंतर शेवटी ग्रेडर ने शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे कबूल केले आणि आता आपली तक्रार होऊन पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल होईल या भितीने ग्रेडर ने शेतकऱ्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या चना या पिकाला क्विंटल मागे हमीभाव केंद्र सरकारतर्फे 4875 च्या वर असताना प्रत्यक्षात मात्र 3800 ते 4200 पर्यंत चना नाफेड तर्फे खरेदी केल्या जात आहे. यानंतर सुद्धा जर नाफेड च्या ग्रेडर तर्फे शेतकऱ्यांकडून पैसे घेत जात असेल तर शेतकऱ्यांचा वाली कोण ? हा प्रश्न निर्माण होत आहे …

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …