Breaking News

*प्रत्येक व्यक्तीने अत्यावश्यक गरज म्हनू़ण वृक्षारोपण करावे :डॉ.शरयू तायवाडे*

*प्रत्येक व्यक्तीने अत्यावश्यक गरज म्हनू़ण वृक्षारोपण करावे :डॉ.शरयू तायवाडे*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडी:- आपले जीवन जगण्यासाठी प्रत्येक प्राणीमात्राला प्राणवायूची गरज असते.आणि शूध्द प्राणवायू प्राणीमात्रांना वृक्षांपासून प्राप्त होत असतो.आज ठिकठिकाणी विकासाच्‍या नावावर जंगलतोड सुरू आहे,तसेच वेगवेगळ्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे प्राणीमात्रांना जीवन जगणे कठीण होत चालले आहे. त्यात मनूष्यप्राणीसूध्दा महत्वाचा आहे. ओसाड भागात व आपल्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाला वाचविणे आवश्यक झाले आहे.म्‍हनूण प्रत्येक व्यक्तीने आपली अत्यावश्यक गरज समजून वृक्षारोपण करणे गरजेचे झाले आहे.असे मत तायवाडे कॉलेजच्‍या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे यांनी व्यक्त केले.


तायवाडे महाविद्‍यालय महादूला-कोराडी येथील राष्‍ट्रीय सेवा योजना व वनस्‍पतीशास्‍त्र विभागाच्‍या वतीने श्री क्षेत्र आदासा देवस्थान परिसर व मातोश्री वृध्दाश्रम परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्‍यात आला.या कार्यक्रमात अध्यक्ष म्‍हनूण तायवाडे महाविद्‍यालयाच्‍या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे,प्रमुख पाहुणे आदासा-सोनपूर येथील सरपंच श्री.चेतनजी निंबाळकर,माजी सरपंच श्री.राजेंद्रजी जिचकार,मातोश्री वृध्दाश्रम आदासाचे व्यवस्थापक श्री.प्रदीपजी चंदनबटवे हे प्रामुख्‍याने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन राष्‍ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधीकारी डॉ.कीशोर घोरमाडे यांनी तर आभार वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुवर्णा पाटील यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.वकील शेख शूभम चव्हान,ज्ञानेश्वर डहाके व सौरभ मांडवगडे आणि राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …