*समता सैनिक दलाची मागणी राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा*
*राजग्रुहावर हल्ला करणा-या समाजकंटकांना अटक करा*
-समता सैनिक दलाची मागणी
वर्धा प्रतिनिधि- विश्वास बांगरे
वर्धा: संपूर्ण भारतातील आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान दादर मुंबई येथील राजग्रुह या बंगल्यावर काही अज्ञात समाजकंटक माथेफिरुने मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यात घराच्या परिसरातील सीसीटिव्ही कँमे-यांची तोडफोड केली आहे. तसेच काचांवरही दगडफेक करण्यात आली. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून वर्धा येथे समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिका-यां मार्फत मा. मुख्यमंत्री व मा.ग्रुहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
राजग्रुह हे विश्वातील माणसांची अस्मिता आहे. जगभरातील आंबेडकरी अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनंत यातना सोसून पुस्तके ठेवण्यासाठी राजग्रुह बांधले. ते केवळ निवासस्थान नव्हते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानकेंद्र होते.जगातील महत्वाचे ग्रंथ जे बाबासाहेबांनी संकलीत केले होते, ते त्यांनी राजग्रुह या ठिकाणी ठेवले होते. भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व कायदेविषयक परिवर्तनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणजे राजग्रुह होय.राजग्रुह हे केवळ एका जाती धर्माचे अस्मिता स्थान नाही तर ते तमाम भारतीयांचे,कष्टक-यांचे ,श्रमक-यांचे अस्मिता केंद्र आहे. ज्या संविधानाच्या निर्मितीचा पाया राजग्रुहातून रचला गेला अशा या ऐतिहासिक वास्तूवर झालेल्या हल्ल्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.तसेच जनतेत प्रचंड आक्रोश व असंतोष निर्माण झाला आहे.
राजग्रुहावर झालेला भ्याड हल्ला अतिशय निंदनीय असून त्या समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी.तसेच समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीरतेने त्वरित दखल घेऊन या प्रकरणामागील मास्टर माईंड कोण आहेत याचा शोध घ्यावा.
त्याचप्रमाणे देशातील सर्व बौद्ध स्थळांना सुरक्षा पुरवून आंबेडकरी जनतेवर होत असलेले हल्ले तातडीने थांबविण्यात यावेत अशी समता सैनिक दलाच्या वतीने निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष मार्शल अभय कुंभारे, महासचिव स्वप्निल कांबळे,रमेश निमसडकर,प्रा.निरंजण ब्राह्मणे, प्रकाश जिंदे,प्रकाश निमसडकर, प्रदीप भगत, गौतम देशभ्रतार,अरुण भोंगाडे, राजु साळवे,शारदा झामरे,सुनील ढाले,मुकुंदा नाखले,दिनेश वाणी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज