*काही महिन्यात बौद्ध व अनुसूचित जाती – जमाती यांच्या वरील अत्याचारात वाढ व अरविंद बनसोड , विराज जगताप यांच्या वर झालेला हल्ला*
प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा– दिनांक 7 जुलै रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवस्थान *राजगृह* मुंबई यावर संध्याकाळी दोन माथेफिरुनी हल्ला करून राजगृहातील cctv कॅमेरे , फुलझाडांच्या कुंड्या , व दगडांनी काचा फोडण्याचे दुष्कर्म केले .
राजगृह हे आंबेडकरवादी व बौद्धांचे प्रेरणास्थान असून देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील माणसे या प्रेरणा स्थानाला भेट देतात.
१) राजगृहा वर हल्ला करणाऱ्या माथेफिरुनी तात्काळ अटक करून तुरुंगात टाकावे
२)या हल्ला मागील सुत्रधाराला शोधून त्याला सुद्धा कठोर शिक्षा करावी
३) राजगृहाला शासकीय खर्चाने कायम स्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे
४)या पुढे बहुजन बांधवांचे श्रद्धास्थान असलेले कोणतेही स्मारक , विहार , लेणी , पुतळे इत्यादी वर हल्ला होणार नाही यासाठी कठोर कायदा करण्यात यावा …
*या सर्व मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे पाईक असल्याचे दाखवून द्यावे अन्यथा बहुजन बांधव व आंबेडकरी जनता संवैधानिक मार्गाने आंदोलन केल्या शिवाय स्वतः बसणार नाही*
असा इशारा *डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती* वरोरा चे अध्यक्ष आनंदराव वानखेडे यांनी निवेदनातून तहसीलदार साहेब मार्फत सन्मानिय मुख्यमंत्री साहेब यांना दिला आहे
Maharashtra News Media सच की आवाज