Breaking News

*काटोल नरखेड तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतीचे मोठे नुकसान* *शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा*

*काटोल नरखेड तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतीचे मोठे नुकसान*

*शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा*

बेलोना प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के 

बेलोना*गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रशासनाला निर्देश*
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने नरखेड व काटाेल तालुक्यातील शेतीचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे *गृहमंत्री अनिल देशमुख* यांनी प्रशासनाला दिले आहेत.
काटाेल व नरखेड तालुक्यात अतिवृष्टीने शेतीचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली. या तक्रारींची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित दखल घेतली. स्थानिक प्रशासनाला नुकसानीचा आढावा घेऊन त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी पंचनामे त्वरित हाेण्याची आवश्यकता असल्याचे नागपूर *जिल्हा परिषदेचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलिल देशमुख यांनी म्हटले आहे. *

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …