*चामोर्शी शहर बनले समस्यांचे माहेरघर*
*सामाजिक कार्यकर्ता आशीष पिपरे यांचा आरोप*
*मुख्याधिकारी सह आमदरानाही दीले निवेदन*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गढ़चिरोली– शहरात रस्त्यांची झालेली दुरावस्था,उपसा न झालेले नाले व जगोजागी साचलेले घाण पाणी,
प्रशासनाकडून फवारणी न केल्यामुले तसेच शहरातील सार्वजनिक विहरित पावडर न टाकल्याने जनतुंचा व डासांचा वाढता प्रादुर्भाव, सर्वत्र पसरलेली जिवघेनी घाण या मुले चामोर्शि शहर समस्या चे माहेर घर बनले असलयाचा आरोप सामाजिक कार्यकर्ता आशीष पिपरे यानी केला आहे.
या संदर्भात त्यानी नगरपंचायत चे मुख्याधिकारी व आमदार डॉ. देवराव होली याना निवेदन देवुन समस्या निकाली काढन्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की चामोर्शी येथील ग्राम पंचायतिच्या कालात शहराच्या विकासची सर्व कामे व्हायचीत. परंतु जेव्हा नगर पंचायतिची स्थापना झाली तेव्हा विकास कामाना अधिक बलकटी मिडेल व शहर सुजलाम सुफलाम होइल ही आशा होती पन ति साफ सपशेल खोटी ठरली आहे व मुख्याधिकार्यांच्या दुर्लक्ष पना मुड़े ती समस्या अधिकाधिक वाढत जावुन चामोर्षी शहर समस्यांचे माहेरघर बनले आहे.
गेल्या कित्येक महिन्या पासुन आपण शेकड़ो नागरिकासह मुख्याधिकारी याना कित्येक निवेदने दिली पन त्यानि यावर व शहरातिल विविध समस्या कड़े दूर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे.
त्यामुडे शहरातील समस्या वाढत जावून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
असा सनसनाटी आरोप आशीष पिपरे यानी केला आहे.
तेव्हा अशा अकार्यक्षम मुख्याधिकारी यांची त्वरित बदली करावी, अन्यथा आपन स्थानिक नागरिकाना घेवुन बेमुद्दत उपोषण करनार असा इशारा सामाजिक कार्यकर्ता आशीष पिपरे, मुकेश सातपुते,गोपाल चिचघरे, रोशन गड़कर, वासुदेव चिचघरे, व अन्य नागरीकानी दिला आहे.
*शहर विकासाला गति देनार- मुख्याधिकारी सतीश चौधरी*
महाराष्ट्र न्यूज मीडिया ला प्राप्त माहिती नुसार मुख्याधिकारी सतीश चौधरी यानी आपन चामोर्शी नगरपंचायत मधे आल्या पासून शहरातिल प्रत्येक प्रभागच्या समस्या जानून त्याना न्याय देन्या करीता कटिबद्ध आहोत व शहर विकासा करिता प्रयत्नशील आहोत व यापुढ़े ही प्रयत्न शिल राहु असे सांगितले आहे. आपल्या वरिल आरोप हे राजकीय भावनेतुन व बिनबुडाचे असल्याचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांचे महणने आहे.
सामाजिक कार्यकर्ता आशीष पिपरे यांच्या पुढ़िल वाटचाली कड़े नागरीकांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज