Breaking News

*उंदिरा मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*

*उंदिरा मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*

रामटेक तालूका प्रतिनिधि ललित कनोजे

रामटेककडधान्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरी , गोडाउन मधे नुकसान करणारा उपद्रवी प्राणी आता शेतकऱ्यांच्या शेतात करोडोंचा संखेत पोहचला आहे. त्याची प्रजनन दर भरपूर आहे. औषध टाकून मारले तरी कमी होण्या एवजी वाढते. हिवाळा, उन्हाळा किवा पावसाळा असो तिन्ही ऋतु मधे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. पावसाळ्याचा सुरुवातीला शेतकऱ्यांनी धानाचे परी टाकली, पेरिव केली, टिपिव धान केले, तसेच तुरी व कपाशीची व अन्य पिकाची लागवड केली. परंतु करोडोचा संखेत असलेल्‍या उंदरांनी रोपे कात्रुंन टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
शेतकऱ्यांनी उन्दिरचा बंदोबस्तासाठी शेतातील छीद्रे थीमेट टाकून बुजविली आली . परंतु पाहिजे तसा फायदा नाही. विनाकारण शेतकऱ्यावर आर्थिक भुर्दंड पडले. शिवाय पुन्हा परे टाकने , पुन्हा तुरी , कपासी लावणे अशी कामे पुन्हा करावी लागली. हीच गत धान कापणीच्या वेळी हिवाळ्यात व उन्हाळ्यात सुद्धा मोठ्या संख्येने उंदरा कडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उपद्रवी प्राणी उंदीर यांच्या बंदोबस्त राष्ट्रीय स्तरावरून झाली पाहिजे यासाठी कृषी विभाग, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्तपणे उंदीर मारण्याच्या उपक्रम राबवायला पाहिजे असे शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकरी आधीच दुष्काळ, अतिवृष्टि व वेग- वेगळ्या किटकाचा प्रादुर्भाव यामुळे त्रस्त आहेत. वरून उंदरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे त्यांच्यात मोठी भर पडली आहे. ह्याशिवाय शेतकऱ्यांचे वन प्राणी हरीण, रान डुक्कर, बंदर यांच्या मुळे होणारे नुकसान वेगळेच आहे त्यांच्यात उंदराची भर पडली आहे ।

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …