Breaking News

*कुही तालुक्यातील शेतकरी सुखावला* *पावसाच्या पुनः आगमनाने पावसाची वाट पाहणारा शेतकरी वर्ग समाधानी*

*कुही तालुक्यातील शेतकरी सुखावला*

*पावसाच्या पुनः आगमनाने पावसाची वाट पाहणारा शेतकरी वर्ग समाधानी*

कुही प्रतिनिधी :- मयुर ढेंगे

कुही(मांढळ):- साधारणपणे कुही तालुक्यात सर्वच प्रकारचे पीक घेतले जातात त्यातल्या त्यात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दळी मारली होती त्यामुळे भात शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला होता पण अचानक पावसाने दिलेल्या जोरदार हजेरी ने साधारणतः शेतकरी सुखावला असून रोवणी ला जोर धरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाऊस चांगला येणार असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे . शेतकऱ्यांच्या तोंडचा घास जाईल तेवढ्यात निसर्गाची कृपादृष्टी झाली. व उर्वरित शेतकरी पुन्हा जोमाने भातपिकाच्या रोवणी ला सुरुवात करतील. शेवटपर्यंत निसर्ग अशीच साथ देईल अशी शेतकऱ्यांच्या मनात आशेचं किरण आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …