Breaking News

*कुंभी गावाजवळच्या पोटफोडी नदीवर पूल होणार; विजय वडेट्टीवार यांनी दिले निर्देश*

*कुंभी गावाजवळच्या पोटफोडी नदीवर पूल होणार; विजय वडेट्टीवार यांनी दिले निर्देश*

 

गडचिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुड़कर

गडचिरोली: तालुक्यातील कुंभी-माडेमूल गावादरम्यानच्या पोटफोडी नदीवर पूल बांधण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अधिकारी कामाला लागले असून, काही महिन्यांतच त्या परिसरातील नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटणार आहे.

कुंभी व माडेमूल ही गावे गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहेत. परंतु पोटफोडी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात अनेकदा त्या परिसरातील गावांचा संपर्क इतर गावांशी तुटतो. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांत जाता येत नाही. शिवाय कुणी आजारी पडला तर त्यालाही आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत नाही. यासंदर्भात नागरिकांनी अनेकदा आमदार, खासदारांना निवेदन देऊन पूल बांधण्याची विनंती केली. परंतु मागणी पूर्ण झाली नाही. अखेर नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम यांना निवेदन दिले. अॅड.मेश्राम यांनी ही बाब पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कानावर घातली. श्री.वडेट्टीवार यांनी लागलीच पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांना दोन्ही पुलांचे मोजमाप करुन अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार अभियंत्यांनी पुलाचे मोजमाप केले. याप्रसंगी अॅड.राम मेश्राम, नगरसेवक रमेश चौधरी, दीपक मडके, सुनील डोगरा, प्रफुल्ल रामटेके, तुळशीराम मेश्राम, दिवाकर मिसार, ढिवरु मेश्राम, धृवा बांबोळे, निवृत्ता नैताम, डिंपल बांबोळे, पुष्पा सोनुले, सुरेश सोनुले उपस्थित होते.

लवकरच पुलांच्या बांधकामास सुरुवात होणार असल्याने कुंभी व माडेमूल परिसरातील नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …