*आठवडी बाजार व्यवसायिकांना आठवडी बाजार करण्याची परवानगी द्या*

*आठवडी बाजार व्यवसायिकांना आठवडी बाजार करण्याची परवानगी द्या*

प्रतिनिधि-पंकज रोकड़े
आर्वीयुवा स्वाभिमान कडून आर्वी चे मा. उपविभागीय अधिकारी श्री हरीश जी धार्मिक साहेब यांना निवेदन द्वारा विंनती, विंनती मान्य करत उपविभागीय अधिकारी साहेबांनी सकारत्मक प्रतिसाद देत अडचणीत आलेल्या बाजार व्यवसायिकांना दिला आधार, उपविभात येणाऱ्या सर्व गटविकास अधिकारी यांना कार्यलयीन पत्र देऊन देणार सूचना, जिल्ह्यात कोणालाही त्रास होऊ नये, कोणासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा होऊ नये या साठी सर्वस्तरावर सकारत्मक प्रयत्न असल्याची दिली शाश्वती.


आर्वी :दिनांक 22/07/2020 रोज बुधवार ला उशिरा 4 वाजता काही ठराविक बाजार व्यवसायिक व युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी उपविभागीय अधिकारी साहेब हरीश धार्मिक यांची भेट घेतली अनेक वर्षा पासून बाजार बाजार जाणे व त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून आपला व आपल्या परिवाराचा, उदरनिर्वाह करणे अस जीवनमान जगत होते परंतु कोरोना संसर्गाने थैमान घातल्यापासून 4 महिने सर्व बाजार व्यवसायिकांचे व्यवसाय ठप्प होते आणि आता हळूहळू टाळेबंदी प्रक्रिया उघळणे सुरु झाली असताना बाजार व्यवसायिक यांनी सुद्धा कठीण काळातून मुक्ती होईल या विश्वासाने पुन्हा बाजार, बाजार जाण्यास सुरुवात केली परंतु काही ठिकाणी बाजार व्यवसायिकांना अडसर निर्माण करण्यात आला.

काही ठिकाणी बाजारास येण्यास मज्जाव करण्यात येऊ लागला अशात विचारणा केली असता काहींनी कोरोना संक्रमणाची भीती दाखवली तेंव्हा बाजार व्यवसायिकांद्वारा, मा. उपविभागीय अधिकारी धार्मिक साहेब यांच्या समोर ही बाब समोर आणली साहेब जर, इथून हिरवा भाजीपाला,किराणा साहित्य, जीवनावश्यक साहित्य इथल्याच गाडीत जाते इथला च माणूस गाडीभरून देतो, इथल्या दलाला पासून माल घेतल्या जातो, आणि तो माल तिथला स्थानिक व्यापारी विक्री करतोय आणि त्याच्या मुळे संक्रमण होत नसेल तर, तोच माल तीच गाडी तोच दलाल, फक्त माल आम्ही विकल्याने संक्रमण कस होईल, आणि युवा स्वाभिमान पार्टी च्या विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, यांनी निदर्शनास आणून दिल कि एक व्यापारी बाजार व्यवसाय करतो तेंव्हा पाच परिवाराचा उदरनिर्वाह चालतो त्यात व्यापारी, त्याकडे काम करणारे रोजगार कारागीर, हमाल आणि दलाल आणि आज जर आर्वी तील 250-300 व्यापारी जर व्यवसाया पासून वंचीत झालेत तर अप्रत्यक्ष 1200ते 1500 परिवारावर उपासमारीची वेळ येईल आणि यावर आपण आपल्यास्तरावर योग्य ते पावल उचलून अडचणीत आलेल्या बाजार व्यवसायिकांना न्याय देण्याची मागणी युवा स्वाभिमान कडून करण्यात आली आणि विनंती ला तात्काळ प्रतिसाद देत उपविभागीय अधिकारी श्री हरीश जी धार्मिक साहेबांनी उपविभागातील सर्व गट विकास अधिकारी यांना कार्यालयीन पत्र काढून सूचना करण्याचे बोलले तसेच जिल्ह्यात कोणालाही उदरनिर्वाहा चा प्रश्न उपस्थित होऊ नये या साठी वर्धा जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही निदर्शनास आणून देण्याची शाश्वती यावेळी दिली या वेळी बाजार व्यवसायिकांनीं आभार व्यक्त केले, निवेदन देताना, युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, सुनील मेन्द्रे, अबिद खा राजु काटणकर, कैलास माहोरे शेख मोबीन, संदीप सहारे, निलेश गुप्ता, सेवक अहुजा उपस्थित होते निवेदनावर 100 लोकांच्या स्वाक्षऱ्या आहे

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …