*कुही तालुक्यातील भोजापुर येथे मिळाला कोरोना पेशंट*
*तालुका प्रतिनिधी निखिल खराबे*
कुही:- दिवसाआड कुही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत असून कालच मिळालेल्या रुग्णामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली असून कुहीच्या कोविड सेंटर ला तपासण्याचे वेग वाढले आहे.
त्यातच आज कुही नजीकच असलेल्या गट ग्रा.पं. सिल्ली अंतर्गत येणाऱ्या भोजापुर येथील 45 व्यक्ती तपासणी नंतर पोसिटीव्ह असल्याचे कळले. सदर व्यक्ती चे नागपूर कनेक्शन असून मागील काही दिवसांपासून आजारी असल्याचे समजले.सध्यास्थिती कुही तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या वाढून 4 झाली असून नागरिकांनी मास्कचा वापर करत फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत.